मुंबई - मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार आहे, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या 3 दिवसांत राजीनामा दिला.
नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे या तीनही पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.