ETV Bharat / state

Air India Urination Incident : महिलेसोबत गैरवर्तन प्रकरण, एअर इंडियाकडून चार केबिन क्रू आणि एका पायलटला नोटीस - shankar mishra urination case

विमानात महिलेसोबत गैरवर्तन केल्याचे प्रकरणी एअर इंडियाकडून ठोस पावले उचलण्यात आली ( Air India issues show cause notices ) आहेत. एअर इंडियाने (shankar mishra urination case) चार केबिन क्रू आणि एका पायलटला कारणे दाखवा नोटीस ( show cause notices to four cabin crew and one pilot ) पाठवली आहे. डिजीसीए अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या मार्फत चौकशी करण्यात येत आहे.व्यवस्थापकीय संचालक, एअर इंडिया यांनी या घटनेबाबत नाराजी (Air India Urination Incident) व्यक्त केली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पटियाला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

Air Ind
केबिन क्रू पायलटला कारणे दाखवा नोटीस
author img

By

Published : Jan 7, 2023, 3:51 PM IST

Updated : Jan 7, 2023, 4:25 PM IST

मुंबई : विमानातील महिलेसोबत दुष्कृत्य केल्याप्रकरणी शंकर मिश्रा ह्या प्रवाशाला डीजीसीए यांनी अंतर्गत समिती स्थापन चौकशी सुरू केलेली ( Air India issues show cause notices ) आहे. एअर इंडियाने यासंदर्भात न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवासादरम्यान घडलेल्या घृणास्पद घटनेबाबत पायलट आणि चार क्रू मेंबर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली ( cause notices to four cabin crew and one pilot ) आहे. या संदर्भात एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालक आणि कॅम्पबेल विल्सन यांचे मुख्य कार्यकारी (Air India Urination Incident) अधिकारी यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केला आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्क ते दिल्लीला विमान येत असताना विमानामध्ये एका महिला (shankar mishra urination case) प्रवाशावर दारू पिऊन शंकर मिश्राने लघूशंका ( misbehavior to woman ) केली. नागरी हवाई विमान मंत्रालयाने याबाबत अंतर्गत समिती स्थापन करूण चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पटियाला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

एअर इंडियाने दिली कबुली : एअर इंडियाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. "दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी घटना घडली. तेव्हा न्यूयॉर्क ते दिल्ली दरम्यान फ्लाईट क्रमांक १०२ ऑन बोर्ड सदस्य घटनेमध्ये चार केबिन क्रू सदस्य आणि पायलट होते. यांनी याबाबत तातडीने दखल घेणे जरुरी होते. मात्र, त्यांनी त्याबाबत निष्काळजीपणा केला. म्हणून त्यांना आम्ही याबाबत कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे."

डिजीसीए आणि एयर इंडियाकडून तपासणी : सदर प्रवासी शंकर मिश्रा हा दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याच्याकडुन हे कृत्य केले. त्यामुळे विमानामध्ये दारूचे सेवन करणे किंवा त्यासारख्या पदार्थांचे सेवन करणे याबाबत एअर इंडियाने महत्त्वाचे काही नियम तातडीने लागू केले आहेत.फ्लाइटमध्ये अल्कोहोलची सेवा,घटना हाताळणे, बोर्डवर तक्रार नोंदवणे, तक्रारी हाताळणे, यासह इतर कर्मचार्‍यांकडून चूक झाली की नाही याची अंतर्गत तपासणी डिजीसीए आणि एयर इंडियाकडून सुरू आहे. यासंदर्भात क्रूमधील सदस्यांकडे अशा घटनांच्या संदर्भात तक्रार हाताळण्याची जबाबदारी असते. याबाबत जागरूकता दाखवावी आणि कोणत्याही प्रवासा संदर्भात असे वर्तन होण्यापूर्वी त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करावा याबाबतचे पाऊल एअर इंडियाने उचलायला सुरुवात केली असे म्हटले.

एअर इंडियाकडून स्पष्टीकरण : नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने अल्कोहोलच्या सेवना संदर्भात जे दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या दिशान निर्देशांचे पालन करण्याबाबत एअर इंडियाने देखील सर्व आपल्या कर्मचाऱ्यांना सजग केलेले आहे. त्या सर्वांना त्याबाबतचे काटेकोर पालन करण्यासंदर्भातले निर्देश दिले गेलेले आहेत. विमान प्रवासादरम्यान कोणकोणत्या संदर्भात कोणाकडे कोणती जबाबदारी असायला पाहिजे? अशा घटना घडल्यावर कोणी काय केले पाहिजे? या संदर्भात डीजीसीएचे जे मॅन्यूअल आहे. मॅन्यूअलनुसार एक सॉफ्टवेअर प्रणाली जी आहे ती एअर इंडिया कडून विकसित केली जात आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि डिजिटल स्वरूपात नियंत्रण आणि वॉच ठेवता येईल असे एअर इंडियाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले ( Air India Clarification ) आहे.

पंधरा दिवसांनी चौकशी सुरू : 26 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. त्याची तक्रार 27 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाला प्राप्त झाली. 2 डिसेंबर रोजी तिकिटाचा परतावा सुरू केला, 16 डिसेंबर रोजी पीडित महिलेच्या कुटुंबाने निधीची पावती देखील एअर इंडियाला दिली. तब्बल पंधरा दिवसांनी डीजीसीए यांच्याकडून दहा डिसेंबर रोजी अंतर्गत समिती स्थापन करून चौकशी सुरू केली. ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश, प्रवासी संघटनेचा एक प्रतिनिधी आणि अन्य भारतीय व्यावसायिक विमान कंपनीचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. 20 डिसेंबर रोजी सदर प्रकरणाची फाइल वरिष्ठ समितीकडे पाठवण्यात आली.

शंकर मिश्राला तीस दिवसाची प्रवास बंदी : डीजीसीएच्या अंतर्गत समितीने केलेल्या चौकशीमध्ये शंकर मिश्रा प्रथमदर्शनी दोशी आढळल्यामुळे त्यांना तीस दिवसाची प्रवास बंदी डीजीसीएच्या समितीने केलेली (Shankar Mishra banned 30 days travel ) आहे. ज्या दिवशी यासंदर्भात सध्या घरीच माहिती घेतली त्या दिवसापासून 30 दिवस प्रवास शंकर मिश्रा यांना करता येणार नाही

पीडित महिलेच्या कुटुंबासोबत बैठका : ह्या बाबत एयर इंडिया प्रवक्ता सुप्रीत झा यांनी दिलेल्या माहिती नुसार "20 व 21 डिसेंबर तसेच 26 डिसेंबर आणि 30 डिसेंबर 2022 रोजी वरिष्ठ एअरलाइन कर्मचारी, पीडित महिला आणि तिचे कुटुंब यांच्यामध्ये चार बैठका घेतल्या आणि त्यावरील कारवाई आणि त्यामधील प्रगतीबद्दल चर्चा केली. 26 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीदरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी एअर इंडियाने पोलिसांत तक्रार नोंदवण्याची विनंती केली, तेव्हा तक्रारदार महिलेकडून 28 डिसेंबर 2022 रोजी संबंधित पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली."

Last Updated : Jan 7, 2023, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.