ETV Bharat / state

कृषीतज्ञ किशोर तिवारी यांचा सरकारला घरचा अहेर; अजूनही ४२ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

सरकारने पीक कर्जाचे पैसे बँकांना दिले, मात्र तांत्रिक कारणांमुळे बँकांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडवून ठेवले. यावर गंभीरपणे चर्चा करण्याची वेळ आहे. असे कृषीतज्ञ किशोर तिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते.

कृषीतज्ञ किशोर तिवारी
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:18 PM IST

Updated : Jun 26, 2019, 11:39 PM IST

मुंबई - शेतकऱ्यांना पीक विमा देणाऱ्या कंपन्या फायद्यात आहेत. सरकारने खासगी पीक विमा कंपन्या काढून टाकाव्यात आणि आपली सोशल सिक्युरिटी स्कीम तयार करावी, असे कृषीतज्ञ किशोर तिवारी यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकून घ्यायला बोलावले, मी आभारी आहे. सरकारने मला राज्यमंत्री पद दिले, मात्र कोणी ऐकूनच घेत नाही. टिव्हीवाले मला सल्लागार म्हणतात, पण सरकारमध्ये कोणी आमचा सल्ला घ्यायलाच तयार नाही, अशा शब्दात कृषी तज्ञ किशोर तिवारी यांनी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित शिवसेनेच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला.

सर्व कृषी अधिकारी परदेशी वाऱ्या करून आले आहेत आणि सर्व पोट भरण्याचे धंदे सुरू आहेत. या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना समुद्रात टाकून द्यावं, असं मला वाटतं. त्यापेक्षा लोकांना पैसे द्या, मीठ जाळून तेच पाऊस पाडतील. मी पाहिलंय, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर हे अधिकारी लॅपटॉप घेऊन येतात, प्रेझेन्टेशन देतात आणि खूप चर्चा करतात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही, अशा शब्दांत तिवारी यांनी सरकारचेच वाभाडे काढले.

शिवसेनेच्या बैठकीत बोलताना कृषीतज्ञ किशोर तिवारी

42 लाख लोकांची कर्जमाफी छोट्या-छोट्या कारणांनी अडली आहे. सरकारने पीक कर्जाचे पैसे बँकांना दिले, मात्र तांत्रिक कारणांमुळे बँकांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडवून ठेवले. यावर गंभीरपणे चर्चा करण्याची वेळ आहे, यावर आपणच इथेही बदडू शकतो आणि तिथेही बदडू शकतो. अन्न सुरक्षा अभियान ही लोकप्रतिनिधींनी चळवळ केली पाहिजे. एकही शेतकरी- वंचित उपाशी राहता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले.

राज्यात 10 हजार कोटी रुपयांच्या दवाखान्यांचे भूमीपूजन झाले. पण. एकही दवाखाना सुरू झाला नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तिवारी यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मी दाद देतो. पण, धोरणात्मक बदल झाले पाहिजे. त्यात थर्ड पार्टी म्हणून तुम्हीच हस्तक्षेप करू शकता, असे तिवारी यांनी उध्दव ठाकरे यांना म्हटले. राज्यमंत्री पदाचा लॉलीपॉप दिला तेव्हाच मी सरकारला सांगितले होते झोडतच राहणार, कारण आपण जनतेचे उत्तरदायी आहोत, असे तिवारी यांनी म्हटले.

Intro:मुंबई - शेतकऱ्यांना पीक विमा देणाऱ्या कंपन्या फायद्यात आहेत. सरकारने खाजगी पीक विमा कंपन्या काढून टाकाव्यात आणि सरकारने आपली सोशल सेक्युरिटी स्कीम तयार करावी असे कृषी तज्ञ किशोर तिवारी यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकून घ्यायला बोलावले मी आभारी आहे, पण सरकारने मला राज्यमंत्री पद दिले मात्र कोणी ऐकूनच घेत नाही. टिव्हीवाले मला सल्लागार म्हणतात, पण सरकारमध्ये कोणी आमचा सल्ला घ्यायलाच तयार नाही अशा शब्दांत कृषी तज्ञ किशोर तिवारी यांनी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित शिवसेनेच्या बैठकीत
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला. Body:सर्व कृषी अधिकारी परदेशी वाऱ्या करून आले, पाऊस पडायचे धंदे सुरू आहेत. या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना समुद्रात टाकून द्यावं असं मला वाटतं. त्यापेक्षा लोकांना पैसे द्या, मीठ जाळून तेच पाऊस पाडतील. मी पाहिलंय, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर लॅपटॉप घेऊन येतात, प्रेझेन्टेशन देतात आणि खूप चर्चा करतात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही अशा शब्दांत तिवारी यांनी सरकारचेच वाभाडे काढले.
42 लाख लोकांची कर्जमाफी छोट्या छोट्या कारणांनी अडली आहे. सरकारने पीक कर्जाचे पैसे बँकांना दिले, मात्र तांत्रिक कारणांमुळे बँकांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडवून ठेवले. यावर गंभीरपणे चर्चा करण्याची वेळ आहे, यावर आपणच इथेही बदडू शकतो आणि तिथेही बदडू शकतो.अन्न सुरक्षा अभियान ही लोकप्रतिनिधींनी चळवळ केली पाहिजे.एकही शेतकरी - वंचित उपाशी राहता कामा नये असे तिवारी यांनी सांगितले. Conclusion:राज्यात 10 हजार कोटी रुपयांच्या दवाखान्यांचे भुमीपूजन झाले पण एकही दवाखाना सुरू झाला नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तिवारी यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मी दाद देतो पण धोरणात्मक बदल झाले पाहिजे.
त्यात थर्ड पार्टी म्हणून तुम्हीच हस्तक्षेप करू शकता असे तिवारी यांनी उध्दव ठाकरे यांना म्हटले. राज्यमंत्री पदाच लॉलीपॉप दिला तेव्हाच मी सरकारला सांगितले होते झोडतच राहणार, कारण आपण जनतेला उत्तरदायी आहोत असे तिवारी यांनी म्हटले.
Last Updated : Jun 26, 2019, 11:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.