ETV Bharat / state

Abdul Sattar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस बोलतात 'ती' काळ्या दगडावरची पांढरी रेष - अब्दुल सत्तार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारूनच केला, असा गौप्यस्फोट राज्याचे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर आज सत्तार यांनी फडणवीस जे बोलतात ती काळ्या दगडावरी पांढरी रेष असल्याचे म्हटले आहे.

Abdul Sattar On Devendra Fadnavis
Abdul Sattar On Devendra Fadnavis
author img

By

Published : Feb 14, 2023, 4:57 PM IST

मुंबई : राज्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी पहाटेच्यावेळी विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडला होता. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसात सरकार कोसळले होते. तेव्हापासूनच या शपथविधी सोहळ्याच्या चर्चा सुरू होती. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आज कृषामंत्री अब्दुल सत्तार यांनी फडणवीस जे बोलतात ती काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे म्हटले आहे.

शरद पवारांनी केला विश्वासघात : अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच केला होता. मात्र, माझा दुसऱ्यांदा विश्वासघात झाला, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या वादातून शिवसेना, भाजप युती फिसकटली होती. यातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटे शपथविधी केला होता. मात्र, केवळ अडीच दिवस हे सरकार सत्तेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार पडले होते. मात्र, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.

उद्धव ठाकरेंनी केलेली फसवणूक जिव्हारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर काही राजकीय समीकरणे फिरली. अजित पवार यांनी आपला पाठिंबा काढला. त्यामुळे यावेळी दुसऱ्यांदा आपला विश्वासघात झाला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली फसवणूक ही आपल्या जिव्हारी लागली होती, ती फसवणूक आपल्यासाठी मोठी होती, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले होते.

अजित पवार तोंडघशी पडले : अजित पवार आता नेहमीच पहाटेच्या शपथविधी बाबत बोलणे टाळतात. पत्रकारांनाही त्यांना याबाबत प्रश्न विचारल्यास ते उत्तर देत नाहीत. फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या सोबत स्वच्छ मनाने सरकार स्थापन केले होते. त्यांनी फसवणुकीच्या भावनेतून शपथ घेतली नव्हती. मात्र, नंतर त्यांना तोंडघशी पडावे लागले, असे फडणवीस म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांना त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा मोह होता. त्यामुळे त्यांनी युती तोडली. म्हणून आपण अजित पवार यांना सोबत घेऊन त्यावेळी सरकार स्थापन केले होते असे फडणवीस म्हणाले होते.

शरद पवारांचे प्रत्यूत्तर : त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांनी प्रत्यूत्तर दिले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत, सभ्य आहेत. मात्र, असत्य घटनेचा आधार घेऊन ते अस वक्तव्य करतील अस कधी वाटले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिली होती.

हेही वाचा - IT Raid on BBC Office: बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे.. कर्मचाऱ्यांचे फोन जप्त?, बीबीसी म्हणाले, 'आम्ही..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.