ETV Bharat / state

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ, सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र - etv bharat marathi

आरोग्य विभागाच्या भरतीत उमेदवारांना परीक्षेचे केंद्रावरून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील उमेदवारांना गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्यात परीक्षेचे केंद्र, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगावचे केंद्र मिळाली आहेत. एवढेच नव्हे, तर दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी एक केंद्र सोलापूर, दुसरे कोल्हापूरला मिळाले आहे. यापूर्वी हॉलतिकीटवरून स्थगित केलेली आणि आता घेण्यात येत असलेल्या परीक्षेतही केंद्र निवडीवरून पुन्हा एकदा गोंधळ समोर आला आहे.

हॉलतिकीट
हॉलतिकीट
author img

By

Published : Oct 17, 2021, 4:33 PM IST

मुंबई - आरोग्य विभागाच्या भरतीत उमेदवारांना परीक्षेचे केंद्रावरून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील उमेदवारांना गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्यात परीक्षेचे केंद्र, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगावचे केंद्र मिळाली आहेत. एवढेच नव्हे, तर दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी एक केंद्र सोलापूर, दुसरे कोल्हापूरला मिळाले आहे. यापूर्वी हॉलतिकीटवरून स्थगित केलेली आणि आता घेण्यात येत असलेल्या परीक्षेतही केंद्र निवडीवरून पुन्हा एकदा गोंधळ समोर आला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी दि. 24 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांना हॉलतिकीट प्राप्त होताच परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यात आल्याचे दिसून आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नियमाचे पालन केले जात आहे. याउलट लांबचे प्रवास करून अन्य जिल्ह्यात परीक्षा देण्याची वेळ उमदेवारांवर आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

यापूर्वी आरोग्य विभागातील गट क आणि गट ड या पदासाठी दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार होती. त्यावेळी प्रवेशपत्रावरून गोंधळ उडाल्याने ही परीक्षा आदल्या दिवशी स्थगित करण्यात आली. त्यावरून उमेदवारांच्या झालेल्या नाहक त्रासाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलगिरी व्यक्‍त करावी लागली होती. आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेत हाच गोंधळ पुन्हा निर्माण होत असल्याने उमेदवारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

उमेदवारांच्या अडचणी

आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी न्यासा या कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा दोन सत्रात होत आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्यांना सकाळी एका जिल्ह्यात, तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र देण्यात आले. काही पदासाठी परीक्षा शुल्क भरण्यात आली नसतानाही त्यांना हॉलतिकीट देण्यात आले. जे केंद्र उमेदवारांनी निवडले, ते केंद्र न देता लांबचे केंद्र देण्यात आले. यावरून उमेदवारांनी संबंधित कंपनीला धारेवर धरले आहे. ही कंपनी निवडल्याबद्दल राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर टीका होऊ लागली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मदत क्रमांक

आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी उमेदवारांना हॉलतिकीट प्राप्त होत आहेत. अनेक उमेदवारांना पसंतीचे केंद्र न मिळाल्याची तक्रार आहे. याबाबत या परीक्षेसाठी मदत क्रमांक उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव..?

नितेश दडमल याने ट्विटरवर आपला प्रश्न मांडत थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सवाल केला. त्याचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तसेच अनेक इतर परीक्षार्थी या ट्वीटवर आपली मत मांडत आहेत. तो म्हणाला आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्याबद्दल टोपे साहेब अभिनंदन. अर्ज भरताना तर मी नागपूर परीक्षा केंद्र निवडले होते. असे असतांना आता परीक्षेला सकाळच्या सत्रात ठाणे आणि दुपारच्या सत्रात वाशिम परीक्षा केंद्र दिले गेले आहे. आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.

हेही वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ: रोहित पवार 'न्यासा'वर संतापले, ट्वीटमध्ये म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.