अजबच.. पुण्यातील ७८ वर्षीय 'या' महिलेने आयुष्यात एकदाही वीज वापरलीच नाही
पुणे - विज नसेल तर पुण्यासारख्या शहरात तुम्ही राहू शकाल का? खरं तर हा विचारही करवत नाही. पण पुण्यासारख्या शहरात गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या डॉ. हेमा साने यांनी आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही. सध्या त्यांचे वय आहे 78 वर्षे. तांबडी जोगेश्वरी मंदिराशेजारील बोळात जुन्या आणि जीर्ण वातावरणात झाडांच्या, पक्षांच्या सानिध्यात त्या स्वखुशीने राहतात. 121 बुधवार पेठ हा त्यांचा पत्ता..
सविस्तर वृत्त
'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा; म्हणाले . . .
नवी दिल्ली - चौकीदार चोर है या टीकेवरून राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेलप्रकरणी राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, असा जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी या अगोदरही गांधींनी दोन वेळा खेद व्यक्त केला आहे. मात्र आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला.
सविस्तर वृत्त
पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार - संजय निरुपम
वाराणसी - काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. वाराणसीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, येथील नागरिकांनी गेल्यावेळी ज्यांना निवडून दिले, ते खरेतर औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत.
सविस्तर वृत्त
'अहमदनगर सैराट' संशयाच्या भोवऱ्यात, ऑनर किलिंग की नवऱ्यानेच केली हत्या?
अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे मृत रुख्मिणीच्या सहा वर्षीय लहान भावाने म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकार सैराट नसून पतीनेच पत्नीला जाळून मारल्याचा संशय आल्याने पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त
मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सासवडमध्ये मारहाण, गोशाळेवरून उद्भवला वाद
पुणे- सासवड येथे मंगळवारी सीताराम बाबा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे कार्यकर्त्यांसह आले होते. यावेळी मारुती मंदिरातील कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली असता, पंडित मोडक यांनी कार्यकर्त्यांसह येऊन एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त