दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वावरून न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळली आहे. याचिकेत राहुल यांच्यावर कारवाईसह त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी करण्यात आली होती. याचिकेत त्यांनी स्वेच्छेने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचे म्हटले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 'आम्हाला या याचिकेत काहीही तथ्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही ती फेटाळत आहोत,' असे म्हटले आहे.
सविस्तर वृत्त
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा तांडव सुरूच, पुन्हा केली वाहनांची जाळपोळ
गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर अद्यापही सुरुच आहे. एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथे रस्ता कामावरील मिक्सर मशीन आणि पाण्याच्या टँकरची जाळपोळ केल्याची घटना घडली. गेल्या १० दिवसातील नक्षल्यांनी घडवून आणलेली ही पाचवी घटना आहे.
सविस्तर वृत्त
बाळासाहेब विखे-पाटील यांच्या जयंती सोहळ्याला भाजप-शिवसेना नेत्यांची उपस्थिती
अहमदनगर - दिवंगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणीमध्ये कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-सेना नेत्यांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.
सविस्तर वृत्त
पालघरमध्ये सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनीकडून ग्राहकांना ६० लाखांचा चुना, तिघांना अटक
पालघर - पालघरमध्ये एका गुंतवणूक कंपनीने पैसे दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवून ग्राहकांना ६० लाख रुपयांचा चुना लावला आहे. सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी, असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने सुमारे ४०० जणांना कंपनीचे सदस्य करून घेत त्यामार्फत ही गुंतवणूक केली होती. कंपनीविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त
आयुष्मानच्या 'शुभ मंगल सावधान'च्या सिक्वलची तयारी, अशी असेल कथा
मुंबई - आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शुभ मंगल सावधान' चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.
सविस्तर वृत्त