आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात पत्नीची तक्रार, शारीरिक मानसिक छळाचा गुन्हा दाखल
नाशिक - रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात पत्नीचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. भोकनळची पत्नी पोलीस दलात कार्यरत आहे. वाचा सविस्तर...
घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
औरंगाबाद - घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात गुरुवारी रात्री घडली. आरमान अजीज कुरेशी असे मृत मुलाचे नाव आहे. वाचा सविस्तर...
महात्मा गांधींचा मारेकरी देशभक्त? हे राम, प्रियंकांचा साध्वीवर निशाणा
नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. आज त्यावरच प्रियंका यांनी 'महात्मा गांधींचा मारेकारी देशभक्त? हे राम' असे ट्विट केले आहे. वाचा सविस्तर...
माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते'; 'त्या' वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री हेगडे यांचे घूमजाव
नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीदेखील प्रज्ञासिंह यांचे समर्थन केले होते. यावरून हेगडे यांनी घूमजाव केले असून माझे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर...
अभिमानास्पद; लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी केली टंचाईवर मात, धादवडवाडीला मिळाले पाणी
शिर्डी - पाणी टंचाईमुळे धादवडवाडीचे ग्रामस्थ पाणी टंचाईला तोंड देत होते. मात्र पाणी टंचाईवर कोणतीही उपाययोजना शासनाकडून करण्यात येत नव्हती. तीन ते चार किमीवरून डोक्यावर पाणी आणून महिला शेतातील कामाला जात होत्या. अखेर ग्रामस्थांनी यावर तोडगा काढत लोकवर्गणीतून पाईपलाईन करून पाणी टंचाईवर मात केली. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी...
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra