ETV Bharat / state

आज...आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडीवर एक नजर...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने अभिनेत्री पायल रोहतगी अडचणीत आली आहे, तर दुसरीकडे महिलांसाठी दिल्ली मेट्रोसह डीटीसी बस प्रवास मोफत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. शिवाय गुजरातमध्ये पाणी समस्या सोडवण्याची मागणी करणाऱ्या महिलेला भाजप आमदाराने मारहाण केली आहे. तसेच पुण्यात विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत हातात शस्त्र असल्याने कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये तिसरीही मुलगीच झाल्याने आईने १० दिवसाच्या मुलीची हत्या केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 3, 2019, 2:00 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने 'ही' अभिनेत्री अडचणीत

मुंबई - सोशल मीडियावर बॉलिवूडचे अनेक कलाकार आपली मते मांडताना दिसत असतात. यामुळे काही कलाकारांचे कौतुक होते. काहींना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आपल्या अशाच एका पोस्टमुळे बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अडचणीत आली आहे. तिने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱयांनी तिला धारेवर धरले आहे. वाचा सविस्तर...

खुशखबर ! दिल्ली मेट्रोसह डीटीसी बस प्रवास महिलांना मोफत, केजरीवालांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील महिलांना डीटीसी बस आणि मेट्रोतून मोफत प्रवास करण्याची सुविधा देणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री दिल्लीतील लोधी कॉलनीत भेट दिली असता केजरीवालांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. वाचा सविस्तर...

गुजरातमध्ये हेच का 'अच्छे दिन...' पाणी मागणाऱ्या महिलेला भाजप आमदाराने लाथाबुक्क्यांनी तुडवले..!

अहमदाबाद - पाणी समस्या सोडवण्याची मागणी करणाऱ्या एका महिलेला भाजप आमदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना अहमदाबादमधील नरोदा येथील कुबेरनगरमध्ये घडली. आमदार बलराम थवानी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. वाचा सविस्तर...

पुण्यात विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात एअर रायफलीसह तलवारी, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

पुणे - विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हातात एअरगन, रायफल आणि तलवारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर येथे घडला आहे. तसेच या रायफलीचे ट्रिगर दाबताच त्यातून आवाज येत होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर...

धक्कादायक! तिसरी देखील मुलगीच झाल्यामुळे आईनेच केली १० दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या

नाशिक - तिसरी देखील मुलगीच झाली, या कारणास्तव आईनेच १० दिवसाच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील ही घटना आहे. अनुजा काळे असे या आईचे नाव आहे. वाचा सविस्तर...

बातमी सर्वांच्या आधी...

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.