पुणे दुर्घटना LIVE : बचावकार्य पूर्ण, मजुरांचे मृतदेह मूळ गावाकडे रवाना
पुणे - इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. हे मजूर बिहार राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता बचावकार्य पूर्ण झाले असून मतदेह त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आले. हे मृतदेह उद्या सकाळपर्यंत त्यांच्या मूळ गावात पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाचा सविस्तर...
कोंढवा भिंत दुर्घटनेची सखोल चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुणे - कोंढव्यात संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वाचा सविस्तर...
पुणे दुर्घटना : मृतांच्या नातलगांना राज्य सरकारकडून ५ लाख, तर एनडीआरएफकडून ४ लाखांची मदत जाहीर
पुणे - कोंढवा येथील भिंत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची, तर राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ही मदत करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये मृतांचे नातेवाईकही दगावले आहेत. अशा परिस्थितीत मदत द्यायची कुणाला? असा प्रश्न सरकारसमोर आहे. वाचा सविस्तर...
पोलीस स्टेशनच्या आवारात कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपुर - पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुरेश दाभोळे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर...
आरक्षण आधी दिल असतं तर, मुलगा गेला नसता; उमेशच्या आईचा शासनावर रोष
औरंगाबाद - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, हे आरक्षण आधीच दिले असते तर माझा मुलगा गेला नसता, असा रोष आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या उमेश एंडाईत याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. ऑगस्ट 2018 मध्ये औरंगाबादच्या उमेश एंडाईत या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली होती. उमेश बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिकत होता. शिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याने उमेशने आत्महत्या केली होती. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra