राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचा प्रवेश बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. वाचा सविस्तर...
पुण्यातून तब्बल ८३५ किलो गांजा जप्त; डीआरआयची मोठी कारवाई
पुणे - एका ट्रकमधून नेला जाणारा ८३५ किलो वजनाचा गांजा डीआरआय (डिरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने जप्त केला. या गांजाची किंमत 1 कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. मंचर निरगुडकर रस्त्यावरील पिंपळे गाव खडकी येथे ही कारवाई करण्यात आली. वाचा सविस्तर...
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चकमक, २ दहशतवाद्यांचा खात्मा
गोपालपोरा - जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाली. २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आले आहे. वाचा सविस्तर...
सर्वोच्च न्यायालयही ईव्हीएमच्या फेरफार करण्यात सामील आहे का? डॉ. उदित राज यांचा सवाल
नवी दिल्ली - ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विरोधी पक्ष उचलत असताना काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयावरच शंका घेतली आहे. वाचा सविस्तर...
दुष्काळात गारांच्या पाऊसाने झोडपले, अडीच हजार हेक्टर द्राक्षबागा बाधित
सांगली - ऐन दुष्काळात सांगलीच्या तासगाव तालुक्याला जोरदार अवकाळी गारांच्या पाऊसाने मंगळवारी झोडपून काढले आहे. यामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर द्राक्षबाग क्षेत्र या गारांच्या तडाख्याने बाधित झाले आहे. आधीच दुष्काळाशी दोन हात करून मोठ्या हिमतीने टँकरच्या पाण्यावर जागवलेल्या बागा निसर्गाच्या आणखी एका संकटांमुळे अडचणीत सापडल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. वाचा सविस्तर...