ETV Bharat / state

​Shiv Sena : शिवसेनेची संपत्ती शिंदेंच्या रडारवर! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसणार?

author img

By

Published : Feb 21, 2023, 4:38 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील गेले आहे. आता शासकीय कार्यालय आणि संपत्ती मुख्यमंत्री शिंदे यांच्या रडारवर आल्या आहेत. शिंदे गटाने त्या घेतल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसणार आहे. ठाकरे गटाला नव्याने पक्ष बाधंणीसाठी कसोटी करावी लागणार आहे.

​Shiv Sena
​Shiv Sena

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर गेल्या सात महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सोहळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्दाही न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. या वादात निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची याबाबत भूमिका जाहीर केली. शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देत अधिकृत शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आयोगाच्या निकालाविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी निदर्शने केली. आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळातील शिवसेना कार्यालय, संसदेतील कार्यालय ताब्यात घेत ठाकरे गटाला मोठा हादरा दिला आहे.

शेकडो कोटींची स्थावर मालमत्ता : राज्यात शिवसेनेच्या ८२ ठिकाणी मोठी तर मुंबईत २७० ठिकाणी छोटी कार्यालयात आहेत. आता मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या शाखा कार्यालय आणि इमारती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे गटाकडून आला तीव्र विरोध होतो आहे. तसेच, पक्ष निधीवरही शिंदे गडाकडून दावा सांगितला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार शिवसेनेकडे २०२१ पर्यंत सुमारे १८६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि ४८.४६ कोटींच्या ठेवी आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे या संघटनेचे खजिनदार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीने निधीचे व्यवस्थापन करण्याबाबत शिंदे गट विचाराधीन आहे. त्याव्यतिरिक्त शिवसेना भवन, सामना मुखपत्र कार्यालय ठाकरे कुटुंबाच्या मालकीचे ठेवले जाणार आहे. बाकी शिवसेनेचे निगडित सर्व गोष्टींचा ता​​बा शिंदे गट घेणार असल्याचे समजते.

ठाकरेंची कसोटी लागणार : शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक मातब्बर नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण भागात सेनेचे वर्चस्व आहे. मात्र, दोन पडल्यानंतर शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळाल्यामुळे ठाकरे आगामी निवडणुकीच्या तोंडावर गळती लागण्याची शक्यता आहे. कार्यालये, शाखा आणि पक्षनिधी शिंदे गटाकडे गेल्यास ठाकरेंच्या पक्षाला पक्ष कार्यालयांची उणीव भासणार आहे. पडझड रोखण्याबरोबरच नव्याने पक्ष बांधणीसाठी ठाकरेंची मोठी कसोटी लागणार आहे.

शिवसेनेला काहीही नको : शिवसेना भवन, शाखा, पार्टी फंड आम्हाला काहीही नको. शिवसेनेबाबत ठाकरे गटाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केवळ गैरसमज पसरवला जातो आहे. आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांनी पाकिस्तानलाच झापलं.. कंगना म्हणाली, 'घरात घुसून मारलं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.