ETV Bharat / state

लोकसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा 'सोशल इंजिनिअरिंग'वर भर

मुंबईत आज झालेल्या युवक काँग्रेसच्या बैठकीतही राज्यात दलित-ओबीसी अथवा मराठा चेहरा म्हणून विरोधी पक्षनेता दिला जावा अशा स्वरूपाच्या मागण्या अनेक विद्यार्थी आणि तरुणांनी केल्या आहेत.

काँग्रेस
author img

By

Published : Jun 4, 2019, 10:03 AM IST

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस राज्यात बरीच अडचणीत सापडलेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून येत्या काळात सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठीच येत्या काही दिवसात विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसकडून राज्यातील दलित, ओबीसी आणि मराठा यापैकी कोणता चेहरा देता येईल याविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मंथन सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या तब्बल 10 हून अधिक जागांना मोठा फटका बसला होता. हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहिली तर, काँग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे वंचित आघाडीला पर्यायी म्हणून काँग्रेसमध्ये दलित अथवा मुस्लिम चेहरा देता येईल काय अथवा त्यासोबतच ओबीसी किंवा मराठा चेहरा लाभदायी ठरेल का? अशा स्वरूपाची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येते. तर, राज्यातील दलितांना पुन्हा काँग्रेसच्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसच्या दलित नेत्यांना खास जबाबदारी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड यांची नावे यासाठी निश्चित केली असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत आज झालेल्या युवक काँग्रेसच्या बैठकीतही राज्यात दलित-ओबीसी अथवा मराठा चेहरा म्हणून विरोधी पक्षनेता दिला जावा अशा स्वरूपाच्या मागण्या अनेक विद्यार्थी आणि तरुणांनी केल्या आहेत.

यापूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद निवडण्याऐवजी त्यासाठीची सर्व जबाबदारी केंद्रीय समितीवर ढकलली आहे. त्यामुळे या दरम्यान राज्यात दलित-ओबीसी अथवा मराठा चेहरा असलेल्या नेत्यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची माळ टाकण्याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठांकडून केला जात असल्याचे सांगण्यात येते. मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्यासह मुस्लिम नेते म्हणून ओळख असलेल्या नसीम खान यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे यांच्या नावांपैकी एकाची निवड राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी लवकरच केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Intro:लोकसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग भर

Body:लोकसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग भर

मुंबई, ता 3 :

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस राज्यात बरीच अडचणीत सापडलेली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून येत्या काळात सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला वापरण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठीच येत्या काही दिवसात विरोधी पक्ष नेते पदी काँग्रेसकडून राज्यातील दलित ओबीसी आणि मराठा यापैकी कोणता चेहरा देता येईल याविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मंथन सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या तब्बल 10 हून अधिक जागांना मोठा फटका पडला हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहिली तर काँग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल त्यामुळे वंचित आघाडी ला पर्यायी म्हणून काँग्रेस मध्ये दलित अथवा मुस्लिम चेहरा देता येईल काय अथवा त्यासोबतच ओबीसी किंवा मराठा चेहरा लाभदायी ठरेल का अशा स्वरूपाची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येते तर राज्यातील दलितांना पुन्हा काँग्रेसच्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसच्या दलित नेत्यांना खास जबाबदारी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे हे माजी मंत्री वर्षा गायकवाड माजी मंत्री .... राऊत आदींची नावे यासाठी निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे आज मुंबईत झालेल्या युवक काँग्रेसच्या बैठकीतही राज्यात दलित-ओबीसी अथवा मराठा चेहरा म्हणून विरोधी पक्षनेता दिला जावा अशा स्वरूपाच्या मागण्या अनेक विद्यार्थी आणि तरुणांनी केल्या.
तर यापूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद निवडण्याऐवजी त्यासाठीची सर्व जबाबदारी केंद्रीय समितीवर ढकलली आहे त्यामुळे या दरम्यान राज्यात दलित-ओबीसी अथवा मराठा चेहरा असलेल्या नेत्यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची माळ टाकण्याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठांकडून केला जात असल्याचे सांगण्यात येते. मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्यासह मुस्लिम नेते म्हणून ओळख असलेल्या नसीम खान यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे यांच्या नावांपैकी एकाची निवड राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी लवकरच केली जाणार असल्याचे बोलले जात आहे

Conclusion:लोकसभेतील अपयशानंतर काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग भर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.