ETV Bharat / state

आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसात ३ कोटींचा मुद्देमाल जप्त - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

आचारसंहिता लागू झाल्यानंतर ३ कोटींहून अधिक रकमेचे मद्य, मादक पदार्थ व मौल्यवान दागिने निवडणूक आयोगाने जप्त केले आहे. २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निडणुकीचे मतदान होणार आहेे.

निवडणूक आयोग
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:18 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या ३ दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची पत्रकार परिषद

हेही वाचा - शिवसेनेच्या 'भावी मुख्यमंत्र्यांना' 'जन आशीर्वाद' मिळणार का?

१ कोटी ३६ लाखांची रोख रक्कम, १ कोटी ६८ लाख किंमतीचे मद्य, २० लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व ४६ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील ७५ हजार ९८१, सार्वजनिक ठिकाणच्या ७३ हजार ४४५ व खासगी ठिकाणावरील १६ हजार ४२८ जागांवरील अनधिकृत फलक, कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती, पोस्टर व कटआऊट हटवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत ५० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तू टाळाव्यात, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

हेही वाचा - वंचितची पहिली यादी जाहीर; पुन्हा एकदा उमेदवारांच्या जातीचा उल्लेख

Intro:Body:mh_mum_4_ec_dilip_shinde_pc_mumbai_7204684

आचारसंहिता लागल्यावर राज्यात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम, 1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य, 29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक, बॅनर, कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती, पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहचेल अशा वस्तू टाळाव्यात, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.