ETV Bharat / state

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर आज राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नवी मुंबईत - राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते नवी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा घेणार असून या मेळाव्यात नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.

आज राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नवी मुंबईत
author img

By

Published : Sep 15, 2019, 6:15 AM IST

नवी मुंबई- नवी मुंबईतील वजनदार नेते समजले जाणारे गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच 48 नगरसेकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हातात भाजपचे कमळ धरले. त्यामुळे नवी मुंबई महापालिकावरची राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात आली खरी, पण राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवे नेतृत्व उभे करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात असल्याची माहीती आहे.

आज राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नवी मुंबईत

राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते नवी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा घेणार असून या मेळाव्यात नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केलीय. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईमधील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना सुरवात केली. याची सुरवात आजच्या नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यातून होणार आहे. सिवूड इथल्या गणपतशेठ तांडेल मैदानावर नवी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणखी काही दिग्गज नेते नवी मुंबईत जातीन लक्ष घालणार आहेत. तरुण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या गणेश नाईक यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते विशेष मेहनत घेणार असल्याचे सांगितल जात आहे. या मेळाव्यात शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे ही सर्व मंडळी या कार्यकर्ता मेळाव्यात हजर रहाणार आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी सोबत 48 नगरसेवकांच्या साथीने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश नाईक विरुद्ध राष्ट्रवाद असा नवी मुंबईत सत्तासंघर्ष होणार हे मात्र नक्की.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

नवी मुंबई

नवी मुंबईतील वजनदार नेते समजले जाणारे गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच 48 नगरसेकांसह राष्ट्रवादीचं घड्याळ काढून हातात भाजपचं कमळ धरलं...त्यामुळे नवी मुंबई महापालिकावरची राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात आली खरी, पण राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालाचाली सुरू केल्यायेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते नवी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा घेणार असून या मेळाव्यात नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय. Body:लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यात सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केलीये. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईमधील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना सुरवात केलीये. याची सुरवात उद्याच्या नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यातून होणारेय. सिवूड इथल्या गणपतशेठ तांडेल मैदानावर नवी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणखी काही दिग्गज नेते नवी मुंबईत जातीन लक्ष घालणार असल्याचं सांगितलं जातंय. भाजपच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षातील अधिकाधिक तरुणांना संधी देण्याचा विचार राष्ट्रवादीन केलाय. या तरुण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या गणेश नाईक यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते विशेष मेहनत घेणार असल्याचं सांगितलं जातंय. Conclusion:नवी मुंबई उद्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे ही सर्व मंडळी या कार्यकर्ता मेळाव्यात हजर रहाणार आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी सोबत 48 नगरसेवकांच्या साथीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश नाईक विरुद्ध राष्ट्रवाद असा नवी मुंबईत सत्तासंघर्ष होणार हे मात्र नक्की.

प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, नवी मुंबई
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.