ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईच्या वायू गुणवत्तेत सुधार - मुंबई वायू गुणवत्ता

हवा गुणवत्तेबाबत मिळालेली आकडेवारी ही वर्षभरातील सर्वात चांगली आकडेवारी आहे. वेगवान वारे आणि त्याबरोबरच्या पावसाच्या संयोजनामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सुधारली आहे, असे सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) चे अध्यक्ष डॉ. गुफ्राण बेग यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई, Nisarg cyclone Mumbai, air index Mumbai, air quality mumbai
Nisarg cyclone Mumbai
author img

By

Published : Jun 4, 2020, 6:01 PM IST

मुंबई- निसर्ग चक्रीवादळाबरोबर आलेल्या पावसाने शहरातील वायू गुणवत्तेच्या निर्देशांकात सकारात्मक परिणाम केल्याचे दिसून येत आहे. आज वायू गुणवता निर्देशांक हे 17 इतके आहे. ही वर्षभरातील सर्वात चांगली आकडेवारी असल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. आजही मुंबईत पाऊस सुरू आहे. मात्र, पावसामुळे शहरातील वायूमध्ये सुधार घडला आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या अधिकृत संकेतस्थळानुसार आज दुपारी वायू गुणवत्तेची नोंद घेण्यात आली. सध्या शहरातील हवा गुणवत्ता चांगल्या श्रेणीत येते. यामुळे आरोग्यास कमी किंवा फारच धोका नसल्याचे दिसून आले आहे.

कण पदार्थ (पीएम-2.5) चे प्रमाण हे 15 इतके होते. जे वायू गुणवत्तेच्याबाबतीत चांगले असल्याचे समजले आहे. दरम्यान, हवा गुणवत्तेबाबत मिळालेली आकडेवारी ही वर्षभरातील सर्वात चांगली आकडेवारी आहे. वेगवान वारे आणि त्याबरोबरच्या पावसाच्या संयोजनामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सुधारली आहे, असे सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) चे अध्यक्ष डॉ. गुफ्राण बेग यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी शहरातील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 15 असेल, अशी शक्यता सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चने व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.