मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि कायदा सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन उर्फी जावेदवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने देखील राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलिसांकडे काल आपली तक्रार दाखल केली होती. उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी उर्फी जावेदवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने, ही तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज उर्फी आपला जवाब नोंदविण्यासाठी आंबोली पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी उर्फीची तब्बल 1 तास 40 मिनिटे चौकशी करण्यात आली.
जीवे मारण्याची धमकी : कालच अभिनेत्री उर्फी जावेदने महिला आयोगाकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे. तिने काल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याशी याबाबत बातचीत केली आहे. आपण विशिष्ट समाजाचे असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ आपल्याला टार्गेट करत आहेत. तसेच, आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत आहेत असही उर्फीच्या वकिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
उर्फी जावेदला नोटीस : सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करणे उर्फी जावेदला चांगलेच महागात पडणार अस सध्या चित्र आहे. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिल्यापासून उर्फी चित्रा वाघ यांच्यात ट्विटरवार सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फीची चौकशीसाठी हजर झाली. दरम्यान तिची 1 तास 40 मिनिटे पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्फी जावेदने दिला जवाब : अभिनेत्री उर्फी जावेद आंबोलीने पोलिसांच्या चौकशीत उत्तर दिले. ती म्हणाली की, मी शूटिंगसाठी जे कपडे घालते तेच कपडे घालून बाहेर पडल्यावर अनेक कॅमेरामन माझे फोटो काढतात. मी कोणत्याही वाहिनीवर जात नाही, एकाच फोटोवरून अनेकदा वाद होतात. मला संविधानाने व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे.
तोपर्यंत मी मागे हटणार नाही : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत. जोपर्यंत उर्फी तोकडे कपडे घालणे सोडणार नाही आणि अंगप्रदर्शन करणे थांबवणार नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही अशी ठोस भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली असल्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे.
चित्रा वाघ विरूद्ध उर्फी : उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्डपणामुळे चर्चेत असते विचित्र कपडे आणि हॉट बोल्ड कपड्यांमुळे उर्फी जावेद सध्या अडचणीत आली आहे. त्यामुळे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही अन्यथा थोबाड फोडले जाईल अशी धमकीही त्यांनी उर्फीला दिली होती. या धमकीनंतरच दोघांमध्ये हे प्रकरण तापले होते.
हेही वाचा : Urfi Javed Vs Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्याकडून माझ्या जीवाला धोका, अभिनेत्री उर्फी जावेद आयोगाच्या दारी