मुंबई - जम्मू आणि काश्मीरला वेगळी ओळख देणारे 370 कलम रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे नगरसेवक अरविंद भोसले हे वरळीतील बीडीडी चाळ येथे 'कश्मीर की कली' या संकल्पनेवर आधारित सजावट करून गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
हेही वाचा - मुंबईत गणेशोत्सवानिमित्त पोलीस दलाचा ४० हजाराचा फौजफाटा तैनात
दरवर्षी गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित सजावट केली जाते. यावर्षी भोसले यांनी 370 कलम जम्मू-काश्मीर मधून हटवल्याची संकल्पना घेत बाप्पाची सजावट केलेले आहे. 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता नांदायला हवी. यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन बाप्पाच्या चरणी आनंद व्यक्त करणार आहोत. प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या काश्मीरचा विषय घेऊन यावेळीचा गणेशोत्सव साजरा करणार, असे भोसले यांनी सांगितले.