मुंबई : श्रद्धा वालकर हत्या ( shraddha walker murder case Delhi ) प्रकरणात आरोपी आफताब बाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यानचा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर मारहाण आफताबने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. आफताबने केलेल्या मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते. तिच्या मानेलाही दुखापत झाली होती, अशी माहिती ओझोन हॉस्पिटलच्या डॉ साईप्रसाद शिंदे दिली आहे.
![Shraddha Murder Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16964153_koeo.jpg)
![Shraddha Murder Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16964153_kl.jpg)
![Shraddha Murder Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16964153_dldfj.jpg)
![Shraddha Murder Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16964153_lld.jpg)
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला : 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.
![Shraddha Murder Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-02-aftab-had-severely-beaten-shraddha-byet-vis-mh10065_18112022140041_1811f_1668760241_218.jpg)
आफताब सतत करायचा मारहाण - श्रध्दा वालकरच्या मित्र राहुल रायने मोठा खुलासा केला आहे की, 2020 मध्ये आम्ही सर्वांनी तिला एफआयआर दाखल करण्यात मदत केली जेव्हा तिने आफताबने तिला मारहाण केली. आम्ही तिला घरी नेले. पोलिस अधिकाऱ्याने आफताबला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे सुचवले पण तिने सांगितले की अशा गोष्टी नातेसंबंधात होतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिला पीएसकडे बोलावले तेव्हा तिने सांगितले की, मला भीती वाटते की तो मला मारेल कारण त्याने यापूर्वीही तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिला अनेकदा मारहाण केली आहे. आफताब तिला घरात बंद करत होता. आणि त्याचे दुसरे प्रेमसंबंध आहे आणि इतर मुलींशी बोलतो. यावेळी तिने आफताबच्या वापराचा उल्लेख केला होता.
मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते : श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात आफताबबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यान चा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर मारहाण आफताब ने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. आफताब ने केलेल्या मारहाणीनंतर उपचारासाठी गेलेल्या श्रद्धाला चालता येत नव्हते, तिच्या मानेलाही दुखापत झाली होती. अशी माहिती ओझोन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र इतक्या वेदना होऊनही प्रेमापोटी तिने आफताब सोबतचे राहायचे ठरवल्याचे या प्रकारवरून दिसून येत आहे. खुल्या अंगावर मानेपासून गालापर्यंत तिला जखमेच्या खुणा होत्या झाकलेल्या शरीरावर किती खुणा असू शकतात याचा आपण विचारही करू शकत नाही.