ETV Bharat / state

Bhima Koregaon Update : भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांकडून आयोगासमोर प्रतिज्ञापत्र - bhima koregaon news

2017मध्ये एल्गार परिषदेच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची चौकशी करणाऱ्या भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon ) चौकशी आयोगासमोर पुणे पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर ( Affidavit Submitted by pune police ) केले आहे. त्यावेळी स्मारक ठिकाणी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक येण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी केली होती.

bhima koregaon
भीमा कोरेगाव
author img

By

Published : Jan 31, 2022, 3:12 PM IST

Updated : Jan 31, 2022, 5:03 PM IST

मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची ( Bhima Koregaon Violence Case Investigation ) चौकशी करण्याकरिता राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर पुणे पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. ( Affidavit Submitted by pune police over Bhima Koregaon ) या घटनेवेळी पुणे पोलिसांनी कशाप्रकारे या सर्व घटनेवर नियंत्रण केले तसेच पुण्यामध्ये या सर्व घटनेवर कशाप्रकारे नियंत्रण ठेवण्यात आले या संदर्भातील सर्व माहिती या प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्रात काय?

2017मध्ये एल्गार परिषदेच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची चौकशी करणाऱ्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर पुणे पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यावेळी स्मारक ठिकाणी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक येण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी केली होती. मुंबईच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुरेशी खबरदारी आणि उपाययोजना करण्यात आल्या होत्या, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. पुणे शहराने सर्व संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने पुणे शहराच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दगडफेकीच्या घटना नगण्य झाल्या, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

परिस्थिती कुशलतेने आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळली आणि जमावावर प्रभावी नियंत्रण केल्यामुळे पुणे शहरात कुठेही अशी घटना घडली नाही जिथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. त्यामुळे या हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा शहरात हिंसाचाराची कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही किंवा पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे शुक्ला यांनी सांगितले.

हेही वाचा - Bhima Koregaon War Book : भीमा कोरोगावच्या इतिहासावरून पुन्हा नवा वाद, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण

काय आहे प्रकरण?

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शहर प्रदेश एल्गार परिषदेच्या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांच्यासह लोकांचा एक गट एकत्र आला होता. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी लोक जमले होते. 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नागरिक जमले होते. यानंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथे हिंसाचार घडला होता. पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या हिसांचाराच्या चौकशीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.