मुंबई - रोज राजकारणातील 'वाईल्ड लाईफ' बघतोय, आज मुंबईतील वाईल्ड लाईफही बघायला मिळाले. मुंबईतील जैवविविधता, पर्यावरण जपले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'मुंबई वाईल्ड लाईफ' या चित्रफितीच्या उद्घाटनावेळी दिली.
मुंबईवर चित्रित करण्यात आलेली फिल्म बघितली, ती खूप सुंदर होती. मुंबईतील एक नैसर्गिक सौंदर्य यानिमित्ताने पुढे येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. खूप वर्षांनंतर मुंबईत जन्मलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. मुख्यमंत्री यांच्याशी डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे मला पालिकेच्या कार्यक्रमांना यावेच लागते, असे आदित्य म्हणाले.
हेही वाचा - मुंबईचे 'वाईल्ड लाईफ' जगासमोर आणणार - उद्धव ठाकरे
वाईल्ड मुंबईसाठी आणि जी मुंबई दिवसरात्र काम करते, त्यांना जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी एकत्र काम करूया, असे आदित्य यांनी पालिका प्रशासनाला सांगितले.
हेही वाचा - मुंबई मेट्रोच्या अश्विनी भिडेंची अखेर उचलबांगडी; त्यांच्याजागी रणजीतसिंग देओल यांची नियुक्ती
हेही वाचा - 'मुंबई महापालिकेत भाजप आता विरोधी बाकांवर'