ETV Bharat / state

Sheetal Mhatre Video Case : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; चौकशीनंतर अखेर आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक - साईनाथ दुर्गे अटक

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय असलेला साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, साईनाथ दुर्गेला आज सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

Sheetal Mhatre Video Case
शीतल म्हात्रे प्रकरण
author img

By

Published : Mar 13, 2023, 10:35 PM IST

मुंबई : शितल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शीतल म्हात्रेंनी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज विमानतळावरून युवासेनेच्या कोअर कमिटी मेंबर असलेल्या साईनाथ दुर्गे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातून देखील एकास अटक करण्यात आली असून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

चौकशी दरम्यान केली अटक : शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओचे पडसाद थेट राज्याच्या विधानसभेत देखील उमटले जाणून-बुजून एका महिलेला बदनाम करण्याचे हेतूने हा व्हिडिओ माफ करून फिरवल्याचा किंवा वायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामागे मास्टरमाइंड कोण हे शोधा अशी मागणी शिवसेना भाजपाच्या महिला आमदारांनी केली आहे. त्यात या प्रकरणी कारवाई करत दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले होते. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे युवा सेनेतील प्रमुख चेहरा असून त्यांच्याकडे सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. युवा सेना कार्यकारणी सदस्य पदाची जबाबदारी देखील साईनाथ दुर्गे यांच्या खांद्यावर आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या विरोधात आज दुपारी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. शिंदे सरकार हाय हाय आणि माजले बोके 50 खोके अशा घोषणा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर देण्यात येत होत्या. शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. ही गर्दी युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केल्याच्या विरोधात केली असल्याची माहिती मिळत आहे. शीतल म्हात्रे प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोण आहे साईनाथ दुर्गे ? : या संदर्भात साईनाथ दुर्गे हे मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर साईनाथ दुर्गे 2015 मध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवा सेनेमध्ये प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन युवा सेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी आपले मत मांडले होते.

चौघांना सुनावली पोलिस कोठडी : सिद्धिविनायक मंदिरानजीक दोन अज्ञात इसम पाठलाग करत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला असून त्याबाबत म्हात्रे यांनी कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेतली. याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ६ टीम तपासासाठी बनवण्यात आल्या आहेत. याआधी दहिसर पोलिसांनी कल्याण येथून विनायक डावरे, अशोक मिश्रा, मानस कुवर आणि रवींद्र चौधरी यांना दहिसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संविधान कलम 354A, 509, 500, 34, 67A, 67, 365, 471 आणि 469 अन्वये या चौघांविरोधात गुन्हा दाखल असून त्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच शीतल म्हात्रेप्रकरणी पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपावरून समता नगर पोलिसांनी राजेश गुप्ता याला अटक केली आहे.

हेही वाचा : SIT in Shital Mhatre Viral Video : शितल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण; गृहराज्यमंत्र्यांनी दिले एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.