मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाप्रकरणी संताप व्यक्त केला ( Minister Mangalprabhat Lodha's insult of Chhatrapati ) जातो आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना यावरून घेरले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडूनही शिंदे गटावर ट्वीटवरून सडकून टीका ( Aditya Thackeray tweeted and criticized Lodha ) केली. इमान विकलेल्या गद्दारांची तुलना गद्दारांशी करणे, हे हिंदुत्व नव्हे तर महाराष्ट्र द्वेष आहे, असा हल्लाबोल ठाकरेंनी चढवला.
![Aditya Thackeray tweeted and criticized Mangal Prabhat Lodha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-aditya-on-tweet-7209781_01122022135718_0112f_1669883238_616.jpg)
शिवप्रताप दिनी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे वादग्रस्त वक्तव्य : साताऱ्यातील प्रतापगड येथे शिवप्रताप दिनी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिंदेच्या बंडाची तुलना आग्र्यातील सुटकेशी केली. महाराजांना औरंगजेबाने आग्र्यातील किल्ल्यात ठेवले असताना हिंदवी स्वराज्यासाठी नाट्यमयरित्या सुटका करून घेतली. तिथून बाहेर पडल्यामुळे हिंदू स्वराज्याची स्थापना करू शकले. मुख्यमंत्री शिंदे यांना त्याचप्रकारे रोखण्यात आले. मात्र, शिंदे बाहेर पडले, असे विधान लोढा यांनी केले होते. या विधानाचा राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदे गटाला खडसावले.
आदित्य ठाकरेंनी केली टीका : इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण हेच खोके सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करीत भाजपसह शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.