ETV Bharat / state

Aditya Thackeray : शिंदे फडणवीस सरकारच्या चोरीची फाईल तयार, आदित्य ठाकरेंचा सरकार आल्यावर कारवाईचा इशारा - आदित्य ठाकरेंचा सरकार आल्यावर कारवाईचा इशारा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विराट मोर्चा आज मुंबईत काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले. त्यांनी या खोके सरकारला आपल्या भाषणातून इशारा दिला.

Aditya Thackeray
Aditya Thackeray
author img

By

Published : Jul 1, 2023, 5:35 PM IST

Updated : Jul 1, 2023, 7:35 PM IST

आदित्य ठाकरेंचा कारवाईचा इशारा

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात केला. आजच्या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे याचे भाषण झाले. त्यवेळी ते बोलत होते. टाकरे यांच्या या मोर्चाला मोठी गर्दी झाले होती. त्यामुले समझने वालोंको इशारा काफी है असे ठाकरे म्हणाले. खोके सरकारच्या भुतांना बाजूला करायचे आहे. त्यासाठी आपली साथ पाहिजे आहे. आपली ही अफाट संख्याच सांगत आहे की आपण कुणाच्या बाजूने आहात असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भगवं वादळ दिसतंय - आजच्या मोर्चामध्ये मुंबईच्या सर्वच भागातून आलेले नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे हे भगवं वादळ दिसतंय ती शिवसेनेची ताकद आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत फक्त शिवसेनेची ताकद आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. ा सगळ्याच घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. मुंबईला महापौर नाही. नगरसेवक नाहीत. त्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. ही नामुष्की आहे. असे होता कामा नये, असा इशारा ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच आगामी निवडणुकीत मुंबईवर भगवा झेंडा फडकवणारच असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सरकारच्या चोरीची फाईल तयार असून त्यावर आमचे सरकार आल्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुंबई मनपाची आर्थिक लूट सुरू आहे. मिंधेंना मुंबईला दिल्लीसमोर कटोरा घेऊन, उभे करायचे आहे. हे कदापि होऊ देणार नाही. वर्षभरात त्यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या फाईल तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर त्यांना जेलमध्ये टाकू. खोके सरकारच्या आदेशाने शिवसेनेच्या शाखेवरील बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवणाऱ्यांवर ही बुलडोझर चालवू, असा सूचक इशारा आमदार आदित्य ठाकरेंनी दिला. मुंबई मनपातील घोटाळा विरोधात शिवसेना ठाकरे गटाने धडक मोर्चा काढला. आदित्य ठाकरेंनी मोर्चाचे नेतृत्व करत शिंदे गट आणि भाजपचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांची नक्कल करत टीकेची झोड उठवली.

मुंबईत शिवसेनेची ताकद - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, प्रियंका चक्रवर्ती, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर असे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईत शिवसेनेची ताकद आहे. आजच्या मोर्चाने मुंबईत पुन्हा भगवे वादळ आले आहे. हे वादळ फक्त मुंबईतील असून महाराष्ट्रात अद्याप सुरू केलेले नाही, असे सांगत समझने वालो कों इशारा काफी है, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. मोर्चाला येण्यापूर्वी पीकेट रोडवरील मारुतीचे दर्शन घेतले. मारूती स्तोत्राचा दाखला देत, मनपातील भूते पळवून लावणार असल्याचे सांगताच, शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत, परिसर दणाणून सोडला.

मुंबईतून देशाचे अर्थचक्र चालते - मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतून देशाचे अर्थचक्र चालते. याच मुंबईचा आवाज दिल्लीला ऐकावा लागतो. त्याच मुंबईत लोकप्रतिनिधी नसताना, खोके सरकारकडून दिल्लीच्या इशारावर लूट चालविली आहे. मनपाचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत. परंतु बिल्डरांसाठी रेड कारपेट टाकतात, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबई मनपावर अली बाबा आणि चाळीस चोरांचा दबाव आहे. मुंबईकरांची कामे यामुळे रखडत आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे लोकायुत्त मार्फत चौकशीची मागणी केली. अद्याप त्याबाबत कार्यवाही झाली, याची माहिती नाही. मात्र लवकरच भेट घेणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावरही यावेळी टीकास्त्र सोडले.

किंमत 54 टक्क्यांनी वाढवून पैशाची लूट - मुंबई मनपातील घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. मुंबईसह नागपूर, पुणे आदि महापालिकांची चौकशी लावा. त्या ठिकाणी घोटाळेच घोटाळे झाले आहेत. राज्यासह मुंबईत यापूर्वी असे कधीही राजकारण झाले नसल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईत माजी नगरसेवकांना आयपीएस अधिकारी फोन करतात पक्षांतर करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यांच्या रेकॉर्डिंग हाती आली असून लवकरत कारवाईसाठी देऊ, असा सूचक संकेत आदित्या ठाकरेंनी दिले. मुंबई मनपात शिंदे सरकार आल्यापासून सीसी रोडच्या नावाखाली रस्ते घोटाळा सुरु आहे. मुंबईत कामे करण्यापूर्वी वेगवेगळ्या 42 परवानग्या घ्याव्या लागतात. परंतु, ठेकेदार मित्रांसाठी रस्त्यांच्या किंमत 54 टक्क्यांनी वाढवून पैशाची लूट सुरु आहे. गैरव्यवहार केला जातो आहे. कामे होण्यापूर्वी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात येतो. विधिमंडळात आम्ही आवाज उठवल्यानंतर 600 कोटी रुपये थांबवले. मात्र 50 रस्ते आणि पुलांची कामे अद्याप रखडली आहेत. या सगळ्या घोटाळ्यांच्या फाईल तयार केल्या आहेत. आमचे सरकार आले की जागा दाखवू, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.

छातीवर वार घेण्यासाठी मी तयार - छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना, शिवसैनिकांची मुंबई आहे. या मुंबईला लुटू नका, असे आवाहन केले. पप्पू म्हणून हिणवणाऱ्यांना भाजप आणि शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फैलावर घेतले. छातीवर वार घेण्यासाठी मी तयार आहे. हिंमत असेल तर या, असे थेट आव्हान दिले. खोके सरकार दलालांसाठी काम करत आहे. आमचे सरकार लवकरच येईल, मुंबईच्या लुटारूना जेलमध्ये टाकणार, असा इशारा दिला. भाजपच्या आमदाराने स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघडकीस आणला. हीच भाजप आज दुटप्पी भूमिका घेऊन खोके सरकारला पाठिंबा दिल्याचे ठाकरे म्हणले. खडी, स्ट्रीट फर्निचर घोटाळा आदी मनपातील घोटाळ्यांचा दाखले दिले. मनपाने नेमलेल्या समितीची मोर्चात पोलखोल करताना शिंदे सरकारावर आसूड ओढले.

शिवसेनेचा आवाज बुलंद करणार - मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता असताना, 92 हजार कोटींपर्यंत ठेवी वाढवल्या. शिंदे सरकार आल्यापासून 600 कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या आहेत. या घोटाळ्याची नोंद घेतली आहे. मुंबईकरांच्या पैशाला हात लावला तर सोडणार नाही, असा इशारा दिला. आगामी काळात शिवसेनेचा आवाज बुलंद करणार आहे. शिवसेना महाराष्ट्रासाठी लढणार आहे. भाजप आणि मिंधेंना मुंबईला दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभे करायचे आहे. या सर्वांविरोधात एकटा लढतो आहे. तुम्ही साथ द्या, असे आवाहन केले. दरम्यान, वांद्रे येथील शाखेवर कारवाई करणाऱ्यांवर सत्ता येईल, त्यावेळी बुलडोझर चालवणार, असा सूचक इशारा दिला.

Last Updated : Jul 1, 2023, 7:35 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.