ETV Bharat / state

Adipurush Row: आदिपुरुषमधील वादग्रस्त संवादानंतर मनोज शुक्लाला मुंबई पोलिसांची सुरक्षा, आतापर्यंत नेमके काय घडले?

author img

By

Published : Jun 20, 2023, 11:17 AM IST

आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला यांना धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली आहे. मुंबई उपनगरातील शुक्ला यांच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी गस्त वाढवली. तसेच त्यांच्या निवासस्थानीही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Manoj Shukla Mumbai police security
मनोज शुक्लाला मुंबई पोलिसांची सुरक्षा

मुंबई: आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला यांनी जीवाला धोका असल्याचा अर्ज शुक्ला मुंबई पोलिसांना दिला. त्यानुसार आम्ही त्यांना सुरक्षा पुरविल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शुक्ला यांच्या अर्जावर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने रविवारी शुक्ला यांच्या कार्यालयाला भेट दिली. मिळालेल्या धमकीबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली आहे. ओम राऊत दिग्दर्शित आणि टी-सिरीज निर्मित, बिग बजेट असलेला आदिपुरुष सिनेमा वादग्रस्त ठरला आहे. सोशल मीडियावर सिनेमातील खराब व्हीएफएक्स आणि टपोरी संवादांमुळे व्हायरल पोस्ट केल्या जात आहेत.

देशभरात सिनेमाविरोधात आंदोलन: भगवान हनुमानाच्या संवादांसाठी शुक्ला यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाविरोधात निदर्शने झाली. वाराणसीमध्ये आंदोलनकर्त्यांनी सिनेमाचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला. हिंदू महासभेने लखनौ पोलिसांकडे निर्माते आणि कलाकारांविरुद्ध तक्रार दाखल केली. मथुरा मंदिरातील थिएटरबाहेर हिंदू संघटनेने आंदोलनही केले.

आपल्या सनातन धर्माच्या अधोगतीला कारणीभूत ठरणारा इतिहास संवादलेखकाने लेखणीने लिहिला आहे. पैसा कमावण्यासाठी व प्रसिद्धीसाठी संपूर्ण धर्मावर अन्याय केला आहे. सरकारने तातडीने दखल घ्यावी. त्यावर कार्यवाही करावी-संत मौनी स्वामी

संवादलेखकाने व्यक्त केली नाराजी: मनोज मुनताशीर यांनी वादावर प्रतिक्रिया देताना काहीशी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की शेकडो ओळींमध्ये श्री रामाचा गौरव व माता सीतेच्या पवित्रतेचे वर्णन केले. पण त्याबाबत स्तुती झाली नाही. मात्र, माझ्याबाबत सोशल मीडियावर असभ्य शब्द लिहिण्यात आले. अनेकजण मनोज मुंतशीर आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसरीकडे सिनेमाबाबत धार्मिक भावना जोडल्या असल्याने काही ठिकाणी संतापदेखील दिसून आला आहे.

कोण आहेत मनोज मुंतशिर? मनोज मुंतशिर शुक्ला यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1976 रोजी गौरीगंज, अमेठी, उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि आई शिक्षिका आहे. त्यांच्या पत्नी नीलम मुंतशीर यादेखील लेखिका आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. बालपणापासून त्यांना कविता लिहिण्याची आवड होती. मनोज मुंतशीर यांचे वडील शिव प्रताप शुक्ला यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सिनेमातील संवादाबाबद प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की आदिपुरुष चित्रपट हा खूप चांगला असून वेद- पुराण वाचूनच संवाद लिहिण्यात आले आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा दृष्टिकोन असतो.

संवादामध्ये होणार बदल: संवादावर टीका होत असताना संवादलेख शुक्ला यांनी काही संवादामध्ये सुधारणा करणार असल्याचे रविवारी सांगितले. या आठवड्यात बदल होणार असल्याचेही शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. आदिपुरुष हा शुक्रवारी हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये प्रभास राघव (राम), क्रिती सेनन जानकी (सीता) आणि सैफ अली खान लंकेश (रावण) या प्रमुख भूमिकेत आहे.

हेही वाचा-

  1. Controvesy On Adipurush: आदिपुरुषचा वाद चिघळला; आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणा, साधू महंतांची मागणी
  2. Adipurush box office collection day 3: प्रभासच्या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये गाठला 300 कोटींचा टप्पा
  3. Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या संवादांवर तीव्र टीका झाल्यानंतर, चित्रपट निर्मात्यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.