ETV Bharat / state

नियोजनामुळे 'पॉवरकट' दरम्यान रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही - सुरेश काकाणी - बीएमसी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी न्यूज

आज सकाळी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. तांत्रिक कारणामुळे निर्माण झालेल्या या गोंधळा दरम्यान रुग्णसेवा मात्र, सुरळीत सुरू होती.

Electricity Supply
वीज पुरवठा
author img

By

Published : Oct 12, 2020, 3:59 PM IST

मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथील टाटा वीज कंपनीच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबईसह इतर जिल्ह्यातील वीज पुरवठा आज सकाळी बंद पडला. वीज पुरवठा बंद होऊन मुंबईची 'बत्ती गुल' झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले. रेल्वे सेवा बंद पडली. यादरम्यान मुंबईतील रुग्णालय सेवा बंद पडेल अशी भीती होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मुंबईमधील रुग्णालय सेवा सुरळीत सुरु होती, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून वीज कंपन्यांसोबत दर महिन्याला आढावा बैठकही घेतली जाईल, असे काकाणी म्हणाले.

पॉवरकट दरम्यान रुग्णालयांची सेवा सुरळीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले

विद्युत वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युतपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला होता. वीज पुरवठा आता टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार कधीतरीच होतो. तरीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते. सर्व रुग्णालयांमध्ये डिझेलवर चालणारी स्वयंचलित जनित्रे सुसज्ज असतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच सर्व जनित्रे पद्धतीने तत्काळ सुरू झाल्याचे काकाणी यांनी सांगितले.

या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि पालिकेच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमधील यंत्रणा तत्काळ कार्यरत झाली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संभाव्य गरज लक्षात घेऊन सर्व विभागांमध्ये डिझेलचा पुरेसा साठाही दिला. या सर्व उपाययोजनांमुळे महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयातील कामकाज अव्याहतपणे आणि सुरळीतपणे सुरू आहे, असे काकाणी म्हणाले.

महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खासगी कोविड रुग्णालयांमध्येही डिझेल साठा पुरेशा प्रमाणात असल्याची व जनित्रे सुरू असल्याची खातरजमा महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे सातत्याने केली जात आहे. त्याचबरोबर इतर खासगी रुग्णालयांमध्ये देखील काही अडचण आल्यास त्यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन रुग्णालयांना करण्यात आले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचा रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही.

वीज खंडित झाली त्यावेळी आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुरळीत सुरू होते. वीज नव्हती त्यादरम्यान ऑपरेशन्स काही तासांनी करण्यात आले मात्र, कोणतेही ऑपरेशन उद्यावर ढकलण्यात आलेले नाही, असे काकाणी यांनी सांगितले. विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी संदेशाची खातरजमा करून घ्यावी. आवश्यकता भासल्यास संबंधित वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन काकाणी यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.