ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case : ब्रेकअपमुळेच तुनिषाची आत्महत्या; प्रियकर अटकेत, वाचा दिवसभरात काय घडलं... - शीझान खान

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने ( TV actress Tunisha Sharma ) 24 डिसेंबरला (शनिवार) टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या ( Tunisha Sharma committed suicide ) केली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील तिचा प्रियकर शीझान खान याला वालीव पोलिसांकडून अटक ( Police arrested Accused ) करण्यात आली आहे. तुनीषा शर्माने तिचा प्रियकर शीझानमुळेच आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शीझानला पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिस सखोल चौकशी करत आहेत.

Tunisha Sharma Suicide Case
तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Dec 25, 2022, 9:41 PM IST

Updated : Dec 25, 2022, 10:55 PM IST

सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव माहिती देताना

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या ( Tunisha Sharma Suicide Case ) बातमीने इंडस्ट्रीतील लोक आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आईने तिच्या मुलीचा सहकलाकार शीजान मोहम्मद खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल ( Tunisha Mother Complaint Against Sheezan Khan ) केली. ज्यावर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुनिषाचा शवविच्छेदन अहवाल : तुनिषा शर्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दीड वाजताच्या सुमारास पाठवण्यात आला होता. पहाटे साडेचार वाजेपर्यंत तुनिषा शर्माच्या मृतदेहाचे जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात ( Tunisha Sharma Postmortem at JJ Hospital ) आले. शवविच्छेदन अहवालातून तुनिषाच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून न आल्याने तिचा गळफास घेतल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी : तुनीषा आणि शीझान खान हे प्रेमसंबंधात होते मात्र 15 दिवसांपूर्वी काही कारणावरून शीझानने तुनीषा सोबत ब्रेकअप केले होते. या नैराश्यातूनचं तुनीषा हिने शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्याचा ( Tunisha Sharma committed suicide due to Lover Breakup ) आरोप तुनीषाच्या आईने केला आहे. तुनीषाच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सैजाण विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास हॉलिडे कोर्टात हजर केले. यावेळी झालेल्या युक्तिवादात आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याला 28 रोजी न्यायालयात हजर करणार असल्याचे शीझानचे वकील रुपेश जयस्वाल यांनी सांगितले.

लव्ह जिहादच्या अँगलने तपासाची मागणी : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणात आरोपी शीजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. त्यावर आता त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या प्रकरणात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घतली असून, त्यांनी या प्रकरणाचा लव्ह जिहाद अँगलने तपास करण्याची मागणी ( Ram Kadam Demand Investigation In Love Jihad Angle ) केली आहे.

एसाआयटीद्वारे तपासाची मागणी : अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून त्याची एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सुरेश गुप्ता यांनी सांगितले की, आज मी ज्या सेटवर तुनिषा शर्माने आत्महत्या केली त्या सेटवर गेलो होतो. या आत्महत्येने लोक घाबरलेले आहेत व लोकांना याबद्दल संशय येत आहे. यामुळे अनेक गोष्टी बाहेर येतील, सेटवर महिला सुरक्षित नाहीत, सेटवर यायला आत खूप घाबरत आहेत. सरकारने या प्रकरणात लक्ष द्यायला पाहिजे. एसआयटीद्वारा या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी सुरेश श्यामलाल यांनी केली आहे.

तुनिषा शर्मा गरोदर होती? : तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर पोलिसांनी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. मात्र, अभिनेत्री गरोदर असल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे नाकारले आहे. अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. साधारणपणे फास लावल्यानंतर गुदमरल्याने मृत्यू होतो. अशा स्थितीत ते आता तुनीषाने गळ्यात बांधलेला दुपट्टा की दोर होता, तो शोधत आहेत. तथापि, आतापर्यंत या प्रकरणात गर्भधारणेशी संबंधित काहीही पुरावे मिळालेले नाहीत. शीझान खानला न्यायालयात हजर करण्यात आले.

वाळीव पोलीसांकडून प्रकरणाचा तपास : या प्रकरणात, इतर डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात काय लिहिले आहे ते विचारात घेऊनच पोलिस त्यांचा तपास पुढे करू शकतात. तथापि, अभिनेत्रीच्या गर्भधारणेची अद्याप पुष्टी झालेली नाही. अशा स्थितीत तुनिषा आई होणार होती असे म्हणणे अफ़वा ठरेल, त्यामुळे तिने असे पाऊल उचलले. शवविच्छेदन अहवालाची संपूर्ण प्रत मिळाल्यावर, त्याचे पूर्ण वाचन केल्यानंतरच आम्ही तपासात पुढे जाऊ, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Dec 25, 2022, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.