मुंबई Actress Tejaswini Pandit Tweet : राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर अडवल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोल नाके विरुद्ध मनसे असा वाद सुरू झाला. त्यानंतर सरकारने टोल दरात वाढ जाहीर केली. मग या दरवाढी विरोधात मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे उपोषणाला बसले. राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. आज राज ठाकरे यांनी 'सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यानुसार महाराष्ट्रात टोल नाक्यांवर चार चाकी वाहनांना अडवलं जात आहे का? हे मनसेचे कार्यकर्ते पाहतील आणि इथे जर दमदाटी होत असेल तर माझे कार्यकर्ते टोलनाके जाळतील' असं वक्तव्य केलं. त्यानंतर या वादात आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने उडी घेतली आहे.
-
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6
">म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6
टोलनाक्यांवर चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश? - सरकारने टोल दरात वाढ केली म्हणून अविनाश जाधव यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांचे उपोषण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये जे काही टोलनाके येतात त्या टोलनाक्यांवर चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश' असल्याचं म्हटलं. सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील हा व्हिडिओवर ट्विट केलाय. "म्हणजे? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून! हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय! तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा!" अशा आशयाचे हे ट्विट आहे.
-
राजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8l
">राजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8lराजसाहेबांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाडयांना आणि चारचाकी गाडयांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 9, 2023
ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी… https://t.co/iUfjVtKb8l
तेजस्विनीच्या ट्विटला मनसेचा रिप्लाय : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेल्या ट्विट नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याची दखल घेऊन, मनसेचे अधिकृत ट्विटर हँडल 'मनसे अधिकृत' या सोशल मीडिया अकाउंट वरून तेजस्विनीला रिप्लाय देण्यात आला आहे. यात मनसेने म्हटलं आहे की, "राज ठाकरे यांनी वाढीव टोलच्या मुद्द्यावर सरकारला सुनावल्यावर, नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस ह्यांनी, मुद्द्याला बगल देण्यासाठी 'आम्ही राज्यात सत्तेत आल्यापासून सगळ्या टोलवर छोट्या गाड्यांना आणि चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती आहे' अशी थाप मारून टाकली. ह्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित ह्यांनी राज ठाकरे यांना ह्या टोलधाडीपासून मुक्त करण्याचं आवाहन केलं आहे. कलाकारांनी वेळेला सरकारला पण जाब विचारला पाहिजे. हे राजसाहेबांचं कायमच आवाहन असतं. आज एका कलाकाराने भूमिका घेतली ह्याबद्दल मनापासून अभिनंदन." असं मनसेने म्हटलं आहे.
हेही वाचा:
- MNS Toll Protest : टोल नाक्यांवरुन मनसे आक्रमक; अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, टोल व्यवस्थापनाने सोडल्या मोफत गाड्या
- Aditya Thackeray On Hospital : आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते सरसावले, मात्र पुढे काय?...आदित्य ठाकरे
- Raj Thackeray on Toll Plaza : राज ठाकरेंचे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, टोल नाक्यांवरून राज्य सरकारला दिला 'हा' इशारा