मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कोरोनाबाधित व्यक्ती आणि त्यांच्या परिवारासोबत होत असलेल्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनाबाधित व्यक्तीसोबत कोणताही भेदभाव करू नये, अशी विनंती आणि आवाहन जनतेला केले आहे.
अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि कलाकारांनी एकत्र येऊन हा अनब्रँडेड व्हिडिओ बनवला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींसोबत होत असलेला भेदभाव रोखण्याच्या हेतूने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा ७० सेकंदांचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन कलाकारांनी आपल्या चाहत्यांना केलं आहे.
सोनाली कुलकर्णीने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन तुम्हीही कोरोनाबाधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबासोबत होत असणाऱ्या आणि होऊ शकणाऱ्या भेदभाव तसेच अन्यायाला रोखण्यास मदत करु शकता, असेही या व्हिडिओतील कलाकारांनी म्हटलं आहे.