ETV Bharat / state

Deepali Sayyad critics : नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे ह्या तर चिल्लर, मुख्य सुत्रधार रश्मी ठाकरे - दिपाली सय्यद - दिपाली सय्यद टीका

शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात दाखल होत आहेत. अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Sayyad) देखील शिंदे गटात जाणार आहेत. शनिवारीपर्यंत हा प्रवेश होणार असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाल्या. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे या चिल्लर असून रश्मी ठाकरे मुख्य सूत्रधार असल्याची जोरदार टीका ( Deepali Sayyad critics on rashmi thackeray ) केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 9, 2022, 5:37 PM IST

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात दाखल होत आहेत. अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Sayyad) देखील शिंदे गटात जाणार आहेत. शनिवारीपर्यंत हा प्रवेश होणार असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाल्या. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे या चिल्लर असून रश्मी ठाकरे मुख्य सूत्रधार असल्याची जोरदार टीका ( Deepali Sayyad critics on rashmi thackeray ) केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

दीपाली सय्यद शिंदे गटात - मागील काही दिवसांपासून दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, मी पुढील तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आली आहे. माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी स्वीकारण्यास तयार आहे. येत्या शनिवार पर्यंत मी शिंदे गटात प्रवेश करेल. मुंबई महानगरपालिकेचे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत, याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याची टीका सय्यद यांनी केली.

मुख्य सूत्रधार रश्मी ठाकरे - शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत, मुख्य सुत्रधार तर रश्मी वहिनी आहेत असा हल्लाबोल दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर चढवला आहे. शिंदे गट आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, समोरून सहकार्य मिळाले नाही. शिंदेनी मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची सध्या गरज असल्याने मी शिंदे गटात जात आहे, असे सय्यद म्हणाल्या.

संजय राऊत यांच्यावर टीका - उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागचे कारण देताना उडवा-उडवीची उत्तरे देत, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊतांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळली असून तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण राऊत असल्याचे सय्यद म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.