ETV Bharat / state

महापालिकेची माझ्यावरील कारवाई हा भेदभाव - सोनू सूद - मुंबई जिल्हा बातमी

अभिनेता सोनू सूद यांच्या मालकीची मुंबईतील शक्ती सागर या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सूद याने न्यायालयात केला आहे.

सोनू सूद
सोनू सूद
author img

By

Published : Jan 13, 2021, 3:08 PM IST

Updated : Jan 13, 2021, 6:50 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील शक्ती सागर या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सोनू सूदने याचिका दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने माझ्यावर केलेली कारवाई ही भेदभाव असून मी इमारतीत कोणताही बदल केला नसल्याचा दावा सोनूने बुधवारी (दि.13 जाने.) न्यायालयत केला आहे.

1992 साली बंधण्यात आले आहे इमारत

शक्ती सागर ही इमारत 1992 साली बांधण्यात आली असून ही सहा मजली इमारत मी 2018 मध्ये खरेदी केली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सोनू सूद याने बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये केला आहे.

मला दिलेली नोटीस ही अस्पष्ट

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली आहे. पालिकेकडून आलेल्या नोटीसीमध्ये एमआरटीपी कायद्याच्या कलम 53 नुसार अनधिकृत बांधकामाचा कोणताच दाखला देण्यात आलेला नाही, असा दावा सोनू सूद यांनी केला आहे.

न्यायालयाने माझी बाजू समजून न घेता दिला निर्णय - सोनू सूद

मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात सोनू सूद याने दिंडोशी येथील सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी सविस्तरपणे त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दिंडोशी न्यायालयाने माझ्या विरोधात दिलेला निर्णय हा माझे म्हणणे नीट ऐकून न घेता दिला आहे, असे सोनू सूद याने म्हटल आहे.

इमारतीचा निवासी व्यावसायासाठी वापर

मुंबई महानगरपालिकेने शक्ती सागर या इमारतीच्या बांधकाम प्रकरणी मला नोटीस बजावलेली आहे. मात्र या इमारतीचा वापर मी निवासी व्यावसायिक कारणासाठी करत असून यातून मिळणारा पैसा आम्ही समाजकार्यासाठी वापरत असल्याचे सोनू सूदने त्याच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - सोनू सूद सवयीचा अपराधी, बीएमसीचा उच्च न्यायालयात आरोप

हेही वाचा - बीएमसीची कारवाई, सोनू सूद पवारांच्या दारी

Last Updated : Jan 13, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.