ETV Bharat / state

रिअल हिरो..! फोन करून राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदचं केलं कौतुक

अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.

Actor Sonu Sood gets Maharashtra Governor's appreciation for helping migrant workers
रिअल हिरो..! सोनू सूदचं राज्यपाल कोश्यारींनी फोन करुन केले कौतुक
author img

By

Published : May 27, 2020, 5:51 PM IST

मुंबई - देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकलवर तर काहींनी मिळेल त्या साधनाच्या मदतीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पुढे येऊन अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. त्याच्या या कामाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे.

  • विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

    — Governor of Maharashtra (@maha_governor) May 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल यांनी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवटरुन देण्यात आली आहे.

दरम्यान, सोनूने आतापर्यंत हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पाठवले आहे. अजूनही तो अहोरात्र त्यांची मदत करत आहेत. बॉलिवूड जगतातून त्याच्या या कामाचे कौतुक होत असून अनेकांनी आता त्याला मदतीचा हात देऊ केला आहे. जोपर्यंत शेवटचा मजूर त्यांच्या घरी जात नाहीत, तोपर्यंत हे काम सुरूच ठेवणार, असा निश्चय सोनूने केला आहे. इतकेच नव्हे तर आता तो विद्यार्थ्यांच्या मदतीला देखील धावला आहे. त्याच्या याच उद्दात कार्यामुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत असताना आज महाराष्ट्राचा राज्यपालांनी त्याच अभिनंदन केले.

हेही वाचा - ...हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांचे खुले आव्हान

हेही वाचा - कोरोना योद्ध्यांकडेच दुर्लक्ष, मुंबई पालिकेतील सी. पी. एस. निवासी डॉक्टरांची तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.