मुंबई- मराठी, हिंदी चित्रपट अभिनेते व मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी मिळाली आहे. मांजरेकर यांना गॅंगस्टर अबू सालेमच्या नावाखाली तब्बल 35 कोटींची खंडणी मागण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संदर्भात रत्नागिरीतून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकरांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी; एकाला अटक
गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल व्हाट्सअॅपवर खंडणीसाठी काही मेसेज येत होते. सुरुवातीला कोणीतरी थट्टामस्करी करत असेल म्हणून महेश मांजरेकर यांनी या गोष्टीकडे दूर्लक्ष केले. मात्र, खंडणीचे मेसेज वारंवार येत होते, तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
महेश मांजरेकर
मुंबई- मराठी, हिंदी चित्रपट अभिनेते व मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी मिळाली आहे. मांजरेकर यांना गॅंगस्टर अबू सालेमच्या नावाखाली तब्बल 35 कोटींची खंडणी मागण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संदर्भात रत्नागिरीतून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Last Updated : Aug 27, 2020, 4:32 PM IST