ETV Bharat / state

Rahul Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात MCOC अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

खासदार राहुल शेवाळे ( Rahul Shewale ) यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात ( Demand for action against MP Rahul Shewale ) आली आहे. शेवाळे यांनी महिलेचे दाऊद सोबत असलेल्या संबंधाची माहिती पोलिसांना का दिली नाही? शेवाळे दुबईला किती वेळा गेले? कोणाला भेटले? या संदर्भातील माहितीही मागविण्यात आली आहे.

Rahul Shewale
Rahul Shewale
author img

By

Published : Dec 26, 2022, 5:32 PM IST

मुंबई - शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( Rahul Shewale ) यांच्यावर MCOC अंतर्गत कारवाईची मागणी ( Demand for action against MP Rahul Shewale ) करण्यात येत आहे. राहुल शेवाळे यांच्या कथित प्रेमप्रकरणात नवा ट्विस्ट आला असून शेवाळेचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत, ती वस्तुस्थिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेवाळे यांनी महिलेचे दाऊद सोबत असलेल्या संबंधाची माहिती पोलिसांना का दिली नाही? शेवाळे दुबईला किती वेळा गेले? कोणाला भेटले? या संदर्भातील माहितीही मागविण्यात आली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे लेखी तक्रार केली आहे.

दरम्यान, राहुल शेवाळे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कथित प्रेम संबंधात असलेली पूर्वीची महिलेचे दाऊद सोबत संबंध असल्याचे आरोप करत एनआयए चौकशी करण्याची मांगणी केली होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंबंधित खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ( MP Rahul Shewale demand in Mumbai ) सदर महिलाही दाऊदशी संबंधित असून यात राष्ट्रवादीचा देखील संबंध असल्याचा आरोप केला आहे.

माझ्यावर खोटे आरोप : या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "मी दिल्लीत सभागृहात दिशा सालीयन प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर एका महिलेच्या आधारे माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. हे प्रकरण जुनंच मात्र आता ते पुन्हा उकरून काढले जाते आणि याच प्रकरणातील काही धक्कादायक खुलासे करण्यासाठी मी इथे तुमच्यासमोर आलो आहे. महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या विरोधात कटकारस्थान सुरू होते. त्यानंतर माझी बदनामी करण्यासाठी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. जेव्हा माझ्यावर आरोप झाले त्यानंतर तब्बल एक वर्ष मी माध्यमांशी काहीही बोललो नाही. या सर्व प्रकरणाच्या मागे कोण आहे? याचा मी शोध घेत होतो.

त्या महिलेचे पाकिस्तानशी संबंध : पुढे बोलताना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, "माझ्यावर ज्या महीलेने आरोप केले त्या महीलेचे कुटूंब क्रिमिनल बॅगराउंड असलेले आहे. सदर महीलेचा भाऊ खुनाच्या आरोपी आहे. स्वतःच्या भावाच्या दहशतीची धमकी ती महिला सर्वांना देते. सदर महीला दुबईत अडकल्यानंतर मी मदत केली. त्यानंतर त्या महीलेची अपेक्षा वाढत गेली. आज ही महिला खोटे फोटो दाखवत आहे. या महिलेने फेक अकाउंट बनवुन व्हिडीओ बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या महिलेचे दाऊद गॅंग बरोबर संबंध आहेत. हे पाकिस्तान कनेक्शन आहे. हे मोठं प्रकरण आहे." असा गंभीर आरोप खासदार शेवाळे यांनी केला आहे.

एनआयएने तपास करण्याची मागणी : "सदर महिला दुबईमध्ये मुस्लीम आहे असे दाखवते. ती पाकिस्तानी गॅंग सोबत आहे. या सर्व आरोपानंतर आम्ही साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सध्या साकीनाका पोलिस त्या महीलेला शोध घेत आहेत. दुबईच्या माध्यमातुन ब्लॅकमेल करण्यात आले असल्याने दुबई पोलिसांना आम्ही तक्रार केली. पाकिस्तान एजंट मार्फत हे सुरू आहे. सदर महीलेला दुबईमध्ये दुबई पोलिसांनी अटक केली होती. ही महिला तिकडे 86 दिवस तुरुंगात होती. अखेर तिला पाच हजार दर महिन्याच्या जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर ती महिला काही दिवस गायब होती. ती एप्रिल पासुन पुन्हा ॲक्टीव झाली आहे. यात थेट पाकिस्तान आणि दाऊदचा संबंध असल्याने या प्रकरणाचा तपास NIA ने करावा अशी मागणी मी NIA च्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच सोमवारी मी मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देखील या तपासाची मागणी करणार आहे."

युवासेना व राष्ट्रवादीचा सहभाग : या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील गंभीर आरोप केले आहेत. सदर महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी माझ्या विरुद्ध भडकवत मला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. तसेच सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा देखील या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.