ETV Bharat / state

अवघ्या एका महिन्यात 880 विनामास्क प्रवाशांवर कारवाई

भारतीय रेल्वेने 17 एप्रिल रोजीपासून कडक नियमावली जाहिर करून अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. जे प्रवासी कोरोना नियमाचे उल्लंघन करत आहे अशा प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. या अतंर्गत, रेल्वे कर्मचाऱ्यांनी विनामास्क घातलेल्या प्रवाशांकडून तब्बल 1 लाख 67 हजार रुपयांची दंड वसूल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

Action taken on 880 unmasked passengers in just one month
अवघ्या एका महिन्यात 880 विनामास्क प्रवाशांवर कारवाई
author img

By

Published : May 18, 2021, 9:54 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वेने रेल्वे परिसरात आणि प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागात 17 एप्रिल ते 17 मे या एका महिन्याच्या कालावधीत विनामास्क 880 प्रवाशांकडून 1 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. तसेच या कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे भारतीय रेल्वेने 17 एप्रिल रोजीपासून कडक नियमावली जाहिर करून अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क आढळल्यास 500 रुपयांचा दंड ठोठविण्यात येत आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही 500 रुपये दंड भरावा लागत आहे. याद्वारे मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी विनामास्क घातलेल्या प्रवाशांकडून दंड वसूली केली आहे.

1 लाख 67 हजार रुपयांची दंड वसुली -

राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' अंतर्गतच्या नियमावलीनुसार, परवानगी असलेल्या प्रवाशांना केवळ लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यासह इतर प्रवाशांना स्थानक परिसरात किंवा लोकलमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे. प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. जे प्रवासी कोरोना नियमाचे उल्लंघन करत आहे अशा प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. या अतंर्गत, रेल्वे कर्मचाऱ्यांनी विनामास्क घातलेल्या प्रवाशांकडून तब्बल 1 लाख 67 हजार रुपयांची दंड वसूल केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.