मुंबई - शहरामधील झाडांची संख्या कमी होत आहे. ती वाढवण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेला ( Municipal Corporation Arrange Workshop For Green Mumbai ) बुधवारी राणीच्या बागेतील सभागृहात सुरुवात झाली. पहिल्या दिवसात दोन चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली होती. हिरवळीचे कोणते वैज्ञानिक दृष्टिकोन, पद्धती स्वीकारल्या जाऊ शकतात. तसेच जैवविविधता वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धती, कार्बन कमी करणे, उष्णता आणि वायू प्रदूषण कमी करणे आणि हरित आवरण राखणे यावर चर्चा करण्यात आली. तर गुरुवारीही अशाच प्रकारे चर्चा सत्रे असून त्यानंतर मुंबई हिरवीगार ( Green Mumbai ) करण्यासाठीचा कृती आरखडा सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी ( Mumbai Municipal Corporation Garden Superintendent ) यांनी दिली.
कार्यशाळेचे उदघाटन मुंबईमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या कमी आहे. यासाठी जी जागा उपलब्ध आहे, त्या जागेत जास्तीत जास्त झाडे कशी लावता येतील, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ( Mumbai Municipal Corporation Garden department ) १४ आणि १५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे ( Workshop For Green Mumbai ) आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाचे महापालिका उपायुक्त किशोर गांधी यांच्या तसेच उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाटन झाले.
पहिले सत्र - पहिल्या सत्रात हिरवळीसाठी कोणते परिसर असुरक्षित आहेत. हिरवळीचे कोणते वैज्ञानिक दृष्टिकोन, पद्धती स्वीकारल्या जाऊ शकतात. यावर चर्चा झाली. त्यात लुबैना रंगवाला कार्यक्रम प्रमुख, शहरी विकास, WRI इंडिया, हिरेन दफ्तरदार माजी उपमुख्य नियोजक, विकास योजना, बीएमसी डॉ. अमिता भिडे, डीन, हॅबिटॅट स्टडीज स्कूल, टीआयएसएस आदींनी सहभाग घेतला. तर डॉ. प्रिया नारायणन, कार्यक्रम व्यवस्थापक, WRI इंडिया (मॉडरेटर) ज्ञानदेव मुंढे, डेप्युटी S.G., (वृक्ष प्राधिकरण) उद्यान विभाग डॉ. शुभलक्ष्मी वायलुरे, संचालक, लेडीबर्ड पर्यावरण सल्लागार वीरेंद्र तिवारी, APCCF, मँग्रोव्ह सेल (tbc) यांची चर्चा झाली.
दुसरे सत्र - दुसऱ्या सत्रात हिरवळीसाठी पर्यावरणीय दृष्टीकोन हा हवामानाच्या अनुकूलतेसाठी सर्वात प्रभावी आहे. जैवविविधता वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धती ( Scientific methods for enhancing biodiversity) , कार्बन कमी करणे, उष्णता आणि वायू प्रदूषण ( Air pollution ) कमी करणे आणि हरित आवरण राखणे यावर चर्चा करण्यात आली. यानंतर डॉ. प्रिया नारायणन, कार्यक्रम व्यवस्थापक, WRI इंडिया (मॉडरेटर), ज्ञानदेव मुंढे, डेप्युटी S.G., (वृक्ष प्राधिकरण) उद्यान विभाग, डॉ. शुभलक्ष्मी वायलुरे संचालक, लेडीबर्ड पर्यावरण सल्लागार वीरेंद्र तिवारी, APCCF, मँग्रोव्ह सेल (tbc) यांची पॅनल चर्चा झाली.
देशभरातील ७५ तज्ज्ञ सहभागी होणार - मुंबईमध्ये ३० लाख झाडे आहेत. मुंबईत मोकळ्या जागा कमी आहेत. यामुळे झाडांची संख्या वाढवणे शक्य नाही. यासाठी जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली आहेत. मियावाकी पद्धतीने ४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. पुलांच्या खाली मोकळी जागा आहे. त्याठिकाणी तसेच मुलांच्या पिलरवर उभी गार्डन उभारण्याचा पालिकेने प्रयत्न केला आहे. इमारतीच्या टेरेसवर उद्यान बनवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. आणखी कोणत्या पद्धतीने मुंबईत हिरवळ निर्माण करता येईल, यासाठी विचारमंथन होणे गरजेचे आहे. यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात देशभरातून ७५ तज्ज्ञ सहभागी होत आहेत. हे तज्ज्ञ जे सल्ले देतील त्याचा एक कृती आराखडा ( Action Plan ) बनवला जाणार आहे. त्यानुसार कार्यवाही करून मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली.