ETV Bharat / state

अवघ्या 12 तासांत 3 हजारांपेक्षा अधिक खासगी बसवर कारवाई - महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग

परिवहन विभागाकडून राबवण्यात आलेल्या खासगी प्रवासी बस तपासणी मोहिमेत राज्यभरात दोषी आढळलेल्या 3 हजार 62 बस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 213 बस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केल्या आहेत. अवघ्या 12 तासांमध्ये 213 बस जप्त करण्यात आल्याने, खासगी प्रवासी वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

अवघ्या 12 तासांत 3 हजारांपेक्षा अधिक खासगी बसवर कारवाई

author img

By

Published : Feb 6, 2021, 10:16 PM IST

मुंबई - परिवहन विभागाकडून राबवण्यात आलेल्या खासगी प्रवासी बस तपासणी मोहिमेत राज्यभरात दोषी आढळलेल्या 3 हजार 62 बस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 213 बस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केल्या आहेत. अवघ्या 12 तासांमध्ये 213 बस जप्त करण्यात आल्याने, खासगी प्रवासी वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

नियमांचा भंग करणार्‍यांवर कारवाई

राज्यभरातील खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा नियमांचे उल्लंघन होते, ज्यामध्ये प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, जादा भाडे आकारने, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसने अशा अनेक कारणांमुळे आरटीओ कार्यालयाने बस तपासण्याची मोहीम होती घेतली आहे. दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांचा मोहिमेत सहभाग

राज्यभरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची विशेष तपासणी मोहीम शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपासून ते शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली, या मोहिमेत राज्यातील सर्व आरटीओ अधिकारी सहभागी झाले होते. अवघ्या 12 तासांमध्ये 3 हजारांपेक्षा अधिक खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करावी

सुटीच्या दिवसांमध्ये रेल्वे आणि एसटी बस गाड्यांना गर्दी असल्याने नागरिक खासगी प्रवासी बसने प्रवास करतात, मात्र नागरिकांच्या गरजेचा फायदा घेत बसचालक नागरिकांकडून तिकिटाचे दुप्पट-तिप्पट पैसे आकारतात. असा प्रकार आढळल्यास संबंधित बसचालकाविरोधात प्रवाशांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.