ठाणे : नववर्षांच्या स्वागताचे जल्लोषात सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिकांसोबत हॉटेल आणि बार सज्ज झाले आहेत. त्यातच आता उल्हासनगर शहरातील सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या चांदणी बारला सील करण्यात आले ( Chandani Bar Seal In Ulhasnagar ) आहे. पोलीस आणि महापालिकेने ही संयुक्तरित्या ही ( Police And Corporation Action Chandani Bar ) कारवाई केली आहे. त्यामुळे 'चांदणी बार'ची छमछम कायमस्वरूपी बंद झाली आहे.
उशीरापर्यमत बारमध्ये छमछम..
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ भागातील १७ सेक्शन परिसरात चांदणी लेडीज बार ( Ulhasanagar Chandani Bar ) आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व कडक निर्बंध लावले असताना सर्रास बार चालू ठेवला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी आणि उल्हासनगर महापालिकेने चांदणी बारवर कारवाई करत तो सील केला आहे.
चांदणी बारवर ८० पेक्षा अधिक गुन्हे
आतापर्यंत या बारवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात ८० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे येथे सुरु असणारी छमछम कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली आहे. कारवाई वेळी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गवारी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - Citizens Attack Police In Yerawada Area : येरवडा परिसरात संशयीत गुन्हेगारासह नागरिकांचा पोलिसांवर हल्ला