ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात मुंबईमध्ये 12 हजार 227 जणांवर कारवाई - mumbai police lockdown violation

गेल्या 24 तासात मुंबई शहरात पोलिसांनी तब्बल 59 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. 20 मार्च ते 14 मे या काळात दक्षिण मुंबईत एकूण 706 गुन्हे दाखल झाले आहेत.

mumbai police
लॉकडाऊन काळात मुंबईमध्ये 12 हजार 227 जणांवर कारवाई
author img

By

Published : May 15, 2020, 6:32 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्ण मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 20 मार्च ते 14 मे या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांसंदर्भात 6 हजार 346 प्रकरणात तब्बल 12 हजार 227 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 692 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून, तब्बल 3 हजार 252 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तसेच 7 हजार 283 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.

गेल्या 24 तासात मुंबई शहरात पोलिसांनी तब्बल 59 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. 20 मार्च ते 14 मे या काळात दक्षिण मुंबईत एकूण 706 गुन्हे दाखल झाले आहेत. मध्य मुंबई 1 हजार 792 गुन्हे दाखल आहेत. तसेच पूर्व मुंबईत 1 हजाक 64 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पश्चिम मुंबई 1 हजार 567 आणि उत्तर मुंबई 1 हजार 217 गुन्हे पोलिसांनी कलम 188 अंतर्गत नोंदविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.