ETV Bharat / state

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन - सरोज खान यांचं निधन

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Ace choreographer Saroj Khan dies of cardiac arrest
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन
author img

By

Published : Jul 3, 2020, 6:46 AM IST

Updated : Jul 3, 2020, 7:20 AM IST

मुंबई - सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सरोज खान यांना 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, वांद्रे येथील गुरूनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यात त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यांची प्रकृती स्थिर होती. पण त्यांना शुक्रवारी पहाटे 1 वाजून 52 मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरोज खान यांच्यावर आज(शुक्रवारी) सकाळीच मालाडमधील क्रबस्तानमध्ये अंत्यसंस्कार पार पडले आहेत.

सरोज खान यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीसह अनेक सुपर स्टारला डान्स शिकवला. दरम्यान, सरोज यांनी आपल्या करिअरची सुरुवात बँकग्राऊंड डान्सर म्हणून केली. गीता मेरा नाम या चित्रपटात १९७४ मध्ये सरोज खान यांना स्वतंत्र कोरिओग्राफर म्हणून ब्रेक मिळाला. ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरोज खान यांनी सुमारे २००० च्या वर गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे.

हेही वाचा - रॅपर दीक्षित जायसवालने बनवले 'चीनी कम', चीनी उत्पादनावर बहिष्काराचे केले आवाहन

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष मुलाखत : "आँख्या का काजल" फेम सपना चौधरीची 'स्ट्रगल स्टोरी'..

Last Updated : Jul 3, 2020, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.