मुंबई : दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, सेल्स टॅक्स ऑफिसर असलेली एक 29 वर्षीय महिला ग्रँड रोड येथे आपल्या नातेवाईकांकडे जाण्याकरता मुंबईत आली होती. पुण्याहून त्या उद्यान एक्सप्रेस मध्ये चढल्या. त्यावेळी, एकाने दादर स्टेशन जवळ तीच्या हातातील बॅग खेचून त्यांना दादर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर ढकलून दिले.
दरम्यान पोलिसांनी जखमी अवस्थेत महिला ट्रेन मधून पडली असावी असे समजून सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोन तासांनी ती शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. रात्री साडेदहा वाजता रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार समजतात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दादर नंतर थेट उद्यान एक्सप्रेस ही सीएसएमटी स्थानकावर जाणार होती. त्यांनी तात्काळ सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले आणि उद्यान एक्सप्रेस मध्ये पाहणी केली. त्यावेळी ज्या कोच मधून त्या महिलेने प्रवास केला होता. त्या कोचच्या शौचालयात पीडित महिलेची कपड्यांची बॅग पडलेली सापडली.
दरम्यान तांत्रिक तपास केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक व्यक्ती उद्यान एक्सप्रेस मध्ये चढताना दिसून आली. मात्र सीसीटीव्ही मध्ये आरोपीच्या चेहरा नीट दिसत नव्हता. आरोपीने घातलेल्या शर्टाच्या बटनांच्या स्ट्रीपमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपीने घातलेल्या शर्टच्या बटनांच्या असलेली रंगीबेरंगी स्ट्रीप पोलिसांनी हेरली. त्यानंतर रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मची पाहणी केली.
ल्यानंतर आरोपी तिकीट रजिस्ट्रेशन काउंटर जवळ झोपल्याचे लक्षात आले. पोलिसांनी ताबडतोब शर्टच्या बटनांच्या ठिकाणी असलेली स्ट्रीप ओळखून आणि महिलेची पर्स बॅग ओळखून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी मनोज चौधरी याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने केलेला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी हा पुण्यात सिक्युरिटी गार्डचे काम करतो. तो मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मनोज ला मध्यप्रदेश येथे घरी जायचे असल्यामुळे तो मुंबईत आला होता. तो प्रथमच मुंबईत आला असल्याची माहिती त्याने रेल्वे पोलिसांना दिली. मात्र रात्री अकराच्या सुमारास रेल्वे पोलिसांना या बद्दल माहिती मिळताच तात्काळ तपास करून आरोपीला पहाटे अटक करण्यात आली.