मुंबई : अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठी अटक (Arrests for Drug Trafficking) करण्यात आलेल्या लोकांच्या माहितीचा डेटाबेस (Drugs case info on Nidaan portal) तयार करण्यात आला असून तो प्रत्यक्षात आणण्यात आला आहे. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी बनवलेले कायदे अंमलात (Enforcement of Narcotics Prohibition Laws) आणण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांना यामुळे मदत होणार आहे. 'निदान' नावाचे हे पोर्टल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) विकसित (Narcotics Control Bureau) केले आहे. देशातील अंमली पदार्थ व्यापार व्यवस्थेविरुद्धच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.
ड्रग्स तस्करांचा डेटाबेस तयार करणार- सिंह पुढे म्हणाले, निदान हा ड्रग्सच्या व्यापाराशी संबंधित आरोपींचा सर्वांत मोठा डेटाबेस असणार आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना मोठी मदत होणार असून ते गुन्हे आटोक्यात आणण्यात यशस्वी होतील. तसेच, गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांकडे सुटकेचे कमी पर्याय असतील आणि त्यांना शिक्षा होईल. या डेटाबेसमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या लोकांची माहिती देखील आहे. हे पोर्टल तयार झाल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची क्षमता वाढणार आहे. यावर अटक आरोपी, दोषी आरोपी आणि जामिनावर मुक्त असलेल्या सर्व आरोपींची माहिती देण्यात येईल. त्यांच्यावर याआधी असलेल्या गुन्ह्यांची देखील माहिती उपलब्ध असल्याने एनसीबीला तपासासाठी याचा चांगला उपयोग भविष्यात होणार आहे.