मुंबई : मुंबईतील पाच महिन्याची गर्भवती भाचीच्या हत्येच्या आरोपामधील महिला आरोपीला दोन वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला ( Accused granted bail after two years ) आहे. 2020 मध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होती. पतीशी भांडण झाल्यानंतर मृत तरूणी आरोपीसह तिच्या घरी राहत होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक त्यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल : अहिल्याबाई काळे हिच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरेल ( pregnant niece Murder ) अशी कृती करणे आणि गर्भवती महिलेचा गर्भपात होईल यादृष्टीने तिला दुखापत करणे या आरोपांखाली नाशिक येथील येवला शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मृत तरूणीच्या आईने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काळे हिला अटक केली होती. वकील हीना मिस्त्री यांच्यामार्फत जामिनासाठी याचिका केली होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या एकलपीठाने काळे हिची याचिका योग्य ठरवून तिला जामीन मंजूर केला.
मुलासोबत प्रेमसंबंध जुळले : मृत तरूणीचे आरोपीच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती गर्भवती राहिली. लग्नादरम्यान मृत तरूणी पतीच्या घरी गेली असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे त्याला (women pregnant before marriage) कळाले. मृत तरूणी गर्भवती असल्याबाबत तिच्या आईने आरोपीकडे विचारणा केली असता. आरोपीने रागाच्या भरात मृत तरुणीला बेदम मारहाण केली. त्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असा पोलिसांचा दावा आहे.
तरुणी गर्भवती राहण्यासाठी जबाबदार : आरोपीचा मुलगा मृत तरुणी गर्भवती राहण्यासाठी जबाबदार असल्यावरून घटनेच्या दिवशी आरोपी आणि मृत तरूणीच्या आईचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने खाटेवर झोपलेल्या मृत तरुणीचे पाय धरून तिला खेचले. परिणामी ती जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. तिला आरोपीनेच रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असा दावा आरोपीच्यावतीने जामिनाची मागणी करताना केला गेला. आरोपी 1 ऑगस्ट 2020 पासून म्हणजे दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात आहे. शिवाय तिच्यावर आरोपपत्र दाखल झाले असून प्रकरणाचा तपासही पूर्ण झाला आहे. आरोपीला या प्रकरणी गोवण्यात आले असून गुन्हा नोंदवण्यातही उशिर झाला आहे. शिवाय वैद्यकीय अहवालाचा विचार करता मृत तरूणी ही शौचालयात पडल्यामुळे तिला दुखापत झाल्याचे दिसते असेही आरोपीच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
शौचालयात घसरून पडली : दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेता मृत तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी ती शौचालयात घसरून पडल्याचे आणि तिला दुखापत झाल्याचे दर्शवणारी नोंद आहे. गुन्हा दाखल करण्यासही विलंब झाला. याचिकाकर्ती दोन वर्षांपासून कोठडीत आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोप खरे असल्याचे गृहीत धरले तरी आरोपीनेच खून केल्याचे सकृतदर्शनी म्हणता येऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने काळे हिची जामिनाची मागणी मान्य केली.