ETV Bharat / state

'मारहाण, हल्ले आणि धमक्या देणे सोडा, डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना काम करा' - डॉ. तात्याराव लहाने डॉक्टर हल्ले टीका

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आरोग्य यंत्रणा मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करत आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी डॉक्टरांसोबत गैरवर्तन केले जाते. असे न करता उलट त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे, असे मत कोरोना कृती दल समितीचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

Dr. Tatyarao Lahane
Dr. Tatyarao Lahane
author img

By

Published : Apr 22, 2021, 3:27 PM IST

मुंबई - कोविड काळात डॉक्टरांना मारहाण करणे, धमक्या देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मात्र, हेच डॉक्टर गेल्या वर्षभरापासून कोरोनाला थोपवण्यासाठी, रुग्णांना जीवदान देण्यासाठी आपली दुःखं बाजूला ठेवून रात्रंदिवस काम करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काम केले पाहिजे, अशी सडेतोड भूमिका कोरोना कृती दल समितीचे सदस्य व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'ईटीव्ही भारत'कडे मांडली.

स्वतःचा मृत्यू डोळ्यांसमोर ठेवून काम -

राज्याच ९ मार्च २०२०ला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू आहे. आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ सर्वजण रात्रंदिवस मेहनत करत आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करताना, आपल्याही संसर्ग होणार याची माहिती असतानाही आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. पीपीई किटमुळे नैसर्गिक विधी देखील अनेकदा त्यांना करता येत नसल्याची स्थिती आहे. आजपर्यंत हजारहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काहींचा मृत्यूदेखील झाला, असे असतानाही स्वतःचा मृत्यू डोळ्यांसमोर ठेवून ही यंत्रणा कार्य करत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

डॉक्टरीपेशामुळेच आपल्याला जीवदान -

पहिली लाट ओसरल्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आजही तेवढ्याच स्पिरीटने आरोग्य कर्मचारी वर्ग काम करत आहेत. वैद्यकीय सेवा ही नियमित सेवा असते, हे आता जवळजवळ सिद्ध झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांवर काही आरोप करण्यापूर्वी, प्रत्येकाने डॉक्टरी पेशामुळेच जीवनदान मिळाल्याचा विचार करायला हवा, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या कामाला तोड नाही -

राज्यातील कोविडची स्थिती पाहता, प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्यासाठी कासावीस झालेले डॉक्टर्स, पॅरामेडिकलचा स्टाफ आपले काम मनापासून करत आहेत. ते आहेत म्हणूनच रुग्णांना जीवदान मिळत आहे. स्वतःवर, कुटुंबावर आलेले दुःख, संकटे देखील बाजूला ठेवून रात्रंदिवस लॅबमध्ये चाचण्या करणे, चाचणीनंतर आवश्यकता ते औषधोपचार करणे, प्रत्येकाला मॉनिटरींग करणे. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणे, प्रत्येक माणसाच्या आजारावर फुंकर घालणे आणि रुग्णांना आजारातून मुक्त करण्याचे काम डॉक्टर करत आहेत. या कामाला तोड नाही. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा, माणून डॉक्टर काम करतात त्यांना मी मानाचा मुजरा करतो. तसेच सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगले आरोग्य, आयुष्य मिळो आणि त्यांची ही सेवा अविरत सुरू राहू दे, अशी प्रार्थना करतो, अशी भावना डॉ. लहाने यांनी व्यक्त केली.

डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काम करा -

कोविडमुळे डॉक्टर हे तणावाखाली काम करत आहेत. त्यामुळे आपल्या रुग्णांसाठी कोणीही त्यांच्यावर प्रेशर आणू नये. डॉक्टर हे सर्वांसाठी सारखे काम करतात. सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करायला हवे. स्वतःला आजारपण असताना आणि आजारी पडणार माहीत असतानाही त्यांची काम करण्याची मानसिकता आहे. अशा वेळी डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने, नागरिकाने प्रयत्न करायला हवेत. तरच त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांवर हसतखेळत औषधोपचार करतील. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ला करण्याऐवजी त्यांना कसे सांभाळता येईल, त्यांना मदत कशी करता येईल, याबाबत सर्वांनी विचार करायला हवा, असे मत डॉ. तात्याराव लहाने यांनी 'ईटीव्ही भारत'कडे मांडले.

आरोग्य कर्मचारी पाठीचा कणा -

आपल्याकडे व्हेंटिलेटरच्या संख्यापेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांवर ताण येत आहे. रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात दाखल करून घेणे, दाखल केलेल्या रुग्णांवर तत्काळ औषधोपचार करण्याचे दुहेरी ताण आरोग्य कर्मचाऱ्यांवर असतो. एवढा ताण असतानाही प्रत्येक रुग्णाकडे बारकाईने लक्ष देऊन आरोग्य कर्मचारी काम करतात. अडचणी कितीही आल्या तरी हे आरोग्य कर्मचारी पाठीचा कणा म्हणून काम करत आहेत. रुग्णांना यामुळेच जीवदान मिळत असल्याचे डॉ. लहाने म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.