CSK vs DC Qualifier 2 : दिल्लीला नमवून चेन्नईची अंतिम फेरीत धडक, आता गाठ मुंबईशी..
विशाखापट्टणम - आयपीएलमध्ये डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सुरु असलेल्या 'क्वालिफायर-२’ सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांत ९ बाद १४७ धावा करत चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीसाठी ऋषभ पंतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. वाचा सविस्तर...
राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता, तर मुंबईच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी
मुंबई- राज्याच्या मुख्य सचिवपदी असलेले युपीएस मदान यांनी आज अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने मुख्य सचिव पद रिक्त झाले होते. या पदावर मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे. प्रवीण परदेशी हे गेल्या साडेचार वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ते प्रशासकीय वर्तुळात परिचित आहेत. लवकरच हे अधिकारी पदाची सूत्र स्वीकारणार आहेत. वाचा सविस्तर ...
VIDEO : काटेरी ताऱ्यातून अस्वल पोहचला डोंगरावर, दगडफेकीनंतर पडला खोल नाल्यात..
श्रीनगर - सध्या मानवी भागात जंगलातील प्राण्यांचा वावर वाढताना दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचे वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातून मानवात आणि वन्यजीवात संघर्ष वाढत आहे. असाच काही प्रसंग जम्मू-काश्मीर येथे घडला. मानवी वस्तीत घुसलेल्या अस्वलावर स्थानिकांनी दगडफेक करत त्याला पाण्यात पाडल्याची लज्जास्पद घटना घडली आहे.
वाचा सविस्तर ...
तब्बल १ हजार ३८१ किलो सोने ठेवायचे कुठे, तिरुपती देवस्थान प्रशासनासमोर गहन प्रश्न
हैदराबाद - जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर असलेले तिरुपती मंदिर हे सोने ठेवण्यासाठी योग्य अशा बँकेच्या शोधात आहे. हे सोने पंजाब नॅशनल बँकेच्या मुदत ठेवीतून परत मिळालेले आहे. तिरुपती देवस्थानाचे हे सोने १ हजार ३८१ किलो एवढे आहे. वाचा सविस्तर ...
ऱ्हदयद्रावक.. मुलीच्या लग्नाच्या चिंतेने स्वतःला जाळून घेत परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या
परभणी- सततच्या दुष्काळामुळे आर्थिक तणावात असलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील धारबा निरस असे शेतकऱ्याचे नाव आहे. हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना भेडसावत होती. शेतात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.वाचा सविस्तर ...