ETV Bharat / state

Portfolio Allocation : खातेवाटपानंतर प्रशासन होणार गतिमान? - खातेवाटपमुळे प्रशासकीय कामांना वेग

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून भाजप शिवसेना शिंदे युतीचे सरकार कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटही आघाडी सरकारमध्ये सामील झाला. मात्र, आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यामुळे आता तरी प्रशासकीय कामकाज गतीने सुरू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Portfolio Allocation
Portfolio Allocation
author img

By

Published : Jul 14, 2023, 7:15 PM IST

Updated : Jul 14, 2023, 7:54 PM IST

काकासाहेब कुलकर्णी, संजीव भोर पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून भाजप, शिवसेना शिंदे गटाचे युतीचे सरकार कार्यरत आहे. त्यात आता अजित पवार गटही आघाडी सरकारमध्ये सामील झाला आहे. आज खातेवाटप झाल्यामुळे राज्यात प्रशासकीय कामांना वेग येणार आहे. अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, वाहतूक, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि हवामान बदल, खाणकाम आणि इतर कोणतेही मंत्रीपद आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, कायदा आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, ऊर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत.

अजित पवारांची कामाला सुरुवात : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची पद्धत अख्या महाराष्ट्राला माहीत. आज अजित पवारांनी वित्त, नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती, कामकाजाचा आढावा घेतला. मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाच्या दालनातून ते आपल्या विभागचे कामकाज पाहणार आहेत. महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपात फेरबदल करून तिढा सुटला आहे. दिल्लीतून तिन्ही पक्षांना खातेवाटपात योग्य न्याय दिल्याने तिन्ही पक्षातील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

प्रशासकीय कामांना गती : सध्या राज्यात महायुती सरकारकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे कामांना गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप थांबाले होते. त्याचा परिणाम राज्यातील प्रशासकीय कामावर पडत होता. त्यामुळे विरोधकांनी शिंदे, भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांची निवड होणार : राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिरतेमुळे अनेक मंत्रिमंडळ उपसमित्यांची पुनर्रचना रखडली होती. या उपसमित्यांच्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री या उपसमित्यांचे अध्यक्ष आहेत. मात्र, सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे अध्यक्ष कोण होणार हे ठरलेले नाही. या कारणास्तव उपसमित्यांच्या बैठका होत नव्हत्या, त्यामुळे उपसमित्यांचे अनेक प्रस्ताव मंजुरीविना पडून आहेत.

मुख्यमंत्र्यांना प्रशासनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही : मंत्री आणि प्रशासन एकाच चाकाच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी राज्याचा कारभार व्यवस्थितपणे चालवत असतात. प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांच्या देखरेखीखाली असल्याने जनतेची कामे लवकर होतात. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खातेवाटपात व्यग्र असल्याने त्यांना फायलींकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याची टीका विरोधकांनी केली होती.

जनतेचे प्रश्न लवकर सुटणार : विरोधकांकडे टीका करण्याशिवाय पर्याय नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन भाजपसोबत महायुती केली आहे. सरकारने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. खातेवाटपानंतर अधिक वेगाने काम होईल, अशी अपेक्षा शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे. महायुती सरकारच्या काळात अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. लवकरच सर्व नियुक्त्या पूर्ण होतील, असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रशासकीय समितीकडे लक्ष देण्याची गरज : मुख्यमंत्र्याकडे अनुभव आहे. नव्या मंत्र्याचा अनुभव देखील अफाट आहे. खातेवाटपानंतर आत्ता सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय समितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रशासनासमोर मोठा पेच प्रसंग : उपमुख्यमंत्रीपद हे राजकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आले आहे. ते घटनात्मक पद नाही. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. अजित पवारांना प्रशासन आणि फायलींची चांगली जाण आहे. त्यामुळे काय आणि कसे निर्णय होतात याची उत्सुकता आहे.

हेही वाचा - Portfolio Allocation : खाते वाटपाचा तिढा सुटला! कही खुशी, तर कही गम ; कोणाला मिळाले कोणते खाते, जाणून घ्या

Last Updated : Jul 14, 2023, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.