मुंबई - एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. शिरीष मुरलीधर गायकवाड असे त्यांचे नाव असून, ते जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत होते.
जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार पीडितेवर एमपीडिएच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत होती. यावेळी कारवाई करायची नसल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड या अधिकाऱ्याने पीडितेकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे पीडित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे याबद्दल तक्रार दाखल केली होती.
तडजोड करीत तक्रारदार पीडितेने लाचेची रक्कम देण्याची तयारी दाखवली. मात्र, या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी लाच मागितल्याची कबूली पोलीस अधिकारी शिरीष गायकवाड दिली. या संदर्भात पोलिसांनी कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.