ETV Bharat / state

चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल - एसी लोकल बातमी मुंबई

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली वातानुकूलित (एसी) लोकल उंचीच्या मुद्यामुळे फक्त ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार होती. परंतु, हा उंचीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे एसी लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर धावणार आहे.

ac-local-will-start-in-mumbai
एसी लोकल
author img

By

Published : Dec 6, 2019, 7:46 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित लोकल (एसी) इगतपुरी कारशेडमध्ये आज दाखल झाली आहे. येत्या 10 दिवसात एसी लोकल मध्य रेल्वे रूळावर येणार असून नाताळच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- एन्काऊंटरच्या समर्थनात महिलांच्या सुरक्षेच्या उणिवा झाकल्या जाऊ नयेत - नीलम गोऱ्हे

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली वातानुकूलित (एसी) लोकल उंचीच्या मुद्यामुळे फक्त ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार होती. परंतु, हा उंचीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे एसी लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर धावणार आहे. मध्य रेल्वेवरील या एसी लोकलची उंची 4270 मिमी असल्यामुळे प्रवाशांना एसी लोकलच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील पुलांच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाल्याने मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ-पनवेल मार्गावरच धावणार, असे निश्चित करण्यात आले होते. परंतु, चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) मध्य रेल्वेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांसह एसी लोकल बनविण्यात आलेली आहे.

ही लोकल भारत हेव्ही इलेक्ट्रिकल लिमिटेड (भेल) कंपनीच्या बनावटीची असल्यामुळे तिच्या जास्त चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. मध्य रेल्वेवर ही लोकल आज दाखल झाल्यानंतर ही लोकल 15 दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या लोकलमध्ये आरामदायी आसन, आधुनिक हँडल, प्रवाशांना उभे राहण्यासाठी जास्त जागा, बॅग ठेवण्यासाठी नव्या बांधणीचा रॅक, टॉक बॅक सिस्टीम बसविण्यात आली आहे.

Intro:
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित लोकल (एसी) इगतपुरी कारशेडमध्ये आज दाखल झाली आहे.
येत्या 10 दिवसात एसी लोकल मध्य रेल्वेवर येणार असून नाताळच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
Body:मध्य रेल्वे मार्गावरील पहिली वातानुकूलित (एसी) लोकल उंचीच्या मुदयामुळे फक्त ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार होती. परंतु हा उंचीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे एसी लोकल आता मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन , ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर धावणार आहे. मध्य रेल्वेवरील या एसी लोकलची उंची 4270 मिमी असल्यामुळे प्रवाशांना एसी लोकलच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील
पुलांच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाल्याने मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरुळ-पनवेल मार्गावरच धावणार असे निश्चित करण्यात आले होते. परंतु चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रेल कोच
फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) मध्य रेल्वेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांसह एसी
लोकल बनविण्यात आलेली आहे. ही लोकल भारत हेव्ही
इलेक्ट्रिकल लिमिटेड ( भेल) कंपनीच्या बनावटीची असल्यामुळे तिच्या जास्त चाचण्या
घेण्याची आवश्यकता नाही. मध्य रेल्वेवर ही लोकल आज दाखल झाल्यानंतर ही लोकल 15 दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या लोकलमध्ये आरामदायी आसन, आधुनिक हँडल, प्रवाशांना उभे राहण्यासाठी जास्त जागा, बॅग ठेवण्यासाठी नव्या बांधणीचा रॅक, टॉक बॅक सिस्टीम बसविण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.