ETV Bharat / state

Mumbai Crime: अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला मुंबईतून अटक, काय आहे नेमके कारण? - मोहम्मद आरिफला अटक

अंडरवर्ल्ड गँगस्टर अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे येथून आज अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या आजमगड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता उत्तर प्रदेश पोलीस आरोपी आरिफला मुंबईतून उत्तर प्रदेशात घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Crime
मोहम्मदला अटक
author img

By

Published : May 26, 2023, 7:31 PM IST

मुंबई : आरोपी मोहम्मद आरिफ याने पीडित शबाना परवीनची बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावली आहे. या प्रकरणी शबाना परवीन यांच्या तक्रारीवरून आरिफविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना परवीन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हेना, सलमान आणि आरिफ यांना या गुन्ह्यात आरोपी बनवले. बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकावल्याचा आणि खंडणीची मागणी केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.

पानटपरीवरून घेतले ताब्यात : या फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेश पोलीस आरिफच्या मागावर बऱ्याच दिवसांपासून होते. तो मुंबईत लपून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. याआधारे तेथील पोलिसांनी मुंबई पोलिसांना आरिफबाबत माहिती देत मदत मागितली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले. आरिफ वांद्रे येथील एका हॉटेलजवळील पान टपरीवर उभा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबई पोलिसांसोबत साध्या वेशात त्याठिकाणी गेले आणि आरिफला ताब्यात घेतले.

२०१७ मध्ये अटक झाली होती : कुख्यात गुंड अबू सालेमची २० नोव्हेंबर २०१७ मध्ये लखनऊ सीबीआय कोर्टात हजेरी सुरू असताना पोलिसांनी आरिफ आणि अबू सालेमचा भाचा सलिक यांना अटक केली होती. हे दोघेही अबू सालेमला न्यायालयात जबरदस्तीने भेटण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, धमकावणे यासह अनेक कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी अंडरवल्डच्या मुसक्या आवळल्याने अंडरवल्ड गुंडांमध्ये पोलिसांविषयी धास्ती भरली आहे.

हेही वाचा:

  1. Thane crime: इंस्टाग्रामवर जुळले प्रेम; महिला कॉन्स्टेबलला गुंगीचे पेय पाजून, जवानाने केला बलात्कार
  2. Drug Destroyed In Mumbai: सीमाशुल्क विभागाने 1500 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट
  3. Thane crime: चुलत भावाच्या सासऱ्याला फोन केल्याचा संशय, अपहरण करून तरूणाला केली बेदम मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.