मुंबई - मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार अबू असीम आझमी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
हेही वाचा - मागाठाणेतील शिवसेना भाजपचे अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
मंगळवारी राज्यातील अनेक पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. समाजवादी पक्षाच्यावतीने अबू आझमी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आझमी यांनी रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. घाटकोपर लिंक रोडवरील मनपा शाळेत असलेल्या निवडणूक कार्यालयात आझमी यांनी अर्ज दाखल केला.